भारताने सराव सामन्यात लंकेला लोळवलं

टी-20 वर्ल्ड कपच्या प्रॅक्टिस मॅचमध्ये टीम इंडियानं विजयानं सुरुवात केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतानं श्रीलंकेचा 26 रन्सने पराभव केला.

Updated: Sep 15, 2012, 04:35 PM IST

www.24taas.com, कोलंबो
टी-20 वर्ल्ड कपच्या प्रॅक्टिस मॅचमध्ये टीम इंडियानं विजयानं सुरुवात केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतानं श्रीलंकेचा 26 रन्सने पराभव केला. इराफन पठाणनं पाच विकेट्स घेत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. तर लक्ष्मीपथी बालाजीनं तीन विकेट्स घेतल्या. या विजयासह टीम इंडियाची सुरुवात जबरदस्त झाली आहे असचं म्हणाव लागेल. आता, भारताची दुसरी प्रॅक्टिस मॅच पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.
टी-20 वर्ल्ड कपच्या प्रॅक्टिस मॅचमध्ये धोनी अँड कंपनीनं विजयी सलामी दिली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियानं 26 रन्सने शानदार विजय मिळवला. या विजयामुळे आगामी टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाचा आत्मविश्वास निश्चितच दुणावणार आहे. ब-य़ाच कालावधीनंतर भारतीय टीममध्ये कमबॅक करणा-या इरफान पठाणनं आपल्य़ा टीमला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. त्यानं लंकेच्या तब्बल 5 बॅट्समनना आऊट करत, टीमचा विजय अधिक सुकर केला. टीममध्ये स्थान मिळवण्य़ासाठी धडपडत असलेल्या पठाणची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद अशीच म्हणावी लागणार आहे. तर एल. बालाजीनही जोरदार कमबॅक करत तीन विकेट्स घेतल्या. आणखी एक कमबॅक मॅन हरभजन सिंगची स्पिन बॉलिंगही या मॅचमध्ये प्रभावी ठरली.
त्याला केवळ एक विकेटच घेण्यात यश आलं असलं तरी, तो या मॅचमध्ये भारताकडून सर्वात इक़ॉनॉमीकल बॉलर ठरला. तत्पूर्वी, भारतानं टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. निर्धारित 20 ओव्हर्समध्ये टीम इंडियाला 5 विकेट्स गमावून 146 रन्सर्यंत मजल मारता आली. कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या नॉटआऊट 55 रन्सच्या इनिंगमुळेच भारताला 146 रन्सचा टप्पा गाठणयात यश आलं. 4 विकेट्स 51 रन्सवरच गमावल्य़ानंतर रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनीनं टीम इंडियाची इनिंग सावरली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 78 रन्सची महत्त्वपूर्ण पार्टनरशीप केली. रोहित शर्मानं 37 रन्सची इनिंग खेळली. दरम्य़ान, रैना, कोहली, सेहवाग आणि युवराज सिंग यांना या मॅचमध्ये फारशी कमाल करता आली नाही. आता, पाकिस्तानविरुद्धच्या दुस-या प्रॅक्टिस मॅचमध्ये टीम इंडियाचे हे टॉप ऑर्डर बॅट्समन या मॅचची कसर भरून काढण्यास आतूर असतील.