शुभेच्छा! 41 वर्षांचा झाला क्रिकेटचा बाप!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज 41 वर्षांचा झालाय. सचिननं आज आपला वाढदिवस लोकशाहीचा सोहळा म्हणजेच आपला मतदानाचा हक्क बजावून त्यानं दिवसाची सुरूवात केली. सचिननं वयाच्या 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं आणि तब्बल 24 वर्ष क्रिकेटच्या पिचवर राज्य केलं. सचिन केवळ एक चांगला क्रिकेटर म्हणूनच नाही तर चांगला माणूस म्हणूनही ओळखला जातो.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 24, 2014, 07:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज 41 वर्षांचा झालाय. सचिननं आज आपला वाढदिवस लोकशाहीचा सोहळा म्हणजेच आपला मतदानाचा हक्क बजावून त्यानं दिवसाची सुरूवात केली. सचिननं वयाच्या 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं आणि तब्बल 24 वर्ष क्रिकेटच्या पिचवर राज्य केलं. सचिन केवळ एक चांगला क्रिकेटर म्हणूनच नाही तर चांगला माणूस म्हणूनही ओळखला जातो.
24 एप्रिल 1973मध्ये मुंबईत जन्मलेल्या सचिननं 1989मध्ये क्रिकेट खेळायला सुरूवात केली. आपल्या बॅटच्या जोरावर त्यानं संपूर्ण जगात क्रिकेट विश्वात आपलं नाव उंचावर पोहोचवलं. टेस्ट आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स बनवणारा हा क्रिकेटपटू आहे.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन तेंडुलकरचा हा पहिलाच वाढदिवस. नोव्हेंबर 2013मध्ये वेस्टइंडिज दौऱ्यातील वानखेडे स्टेडियमवर आपली 200 वी टेस्ट मॅच खेळल्यानंतर सचिननं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
बीसीसीआयनं खास सचिनला निरोप देण्यासाठी या सीरिजचं आयोजन केलं होतं. ज्यात क्रिकेटप्रेमींनी खचाखच भरलेल्या स्टेडियमवर सचिनला भावपूर्ण निरोप देण्यात आला. आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत सचिननं टेस्ट क्रिकेटमध्ये 15,921 आणि 463 वनडे मॅचमध्ये 18, 426 रन्स केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सेंच्युरीची सेंच्युरी करणारा एकुलता एक बॅट्समन आहे. 2011मध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या टीम इंडियाचा सचिन सदस्य होता.
देशाचा सर्वोच्च सन्मान `भारतरत्न` पुरस्कार मिळणारा सचिन पहिला खेळाडू ठरला. नुकतीच सचिननं आयपीएलच्या धर्तीवरील फुटबॉल टीम खरेदी केलीय. अशा या महान क्रिकेटपटूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.