www.24taas.com, झी मीडिया, जमैका
टी-२० क्रिकेट स्पर्धेत वेस्टइंडिजच्या धडाकेबाज ख्रिस गेलने धमाल उडविली होती. तशीच धमाल ट्राय क्रिकेट सिरीजमध्ये उडविली आहे. गेल वादळामुळे श्रीलंकेला पराभव पत्करावा लागला.
गेलच्यात आक्रमक शतकाच्या जोरावर वेस्टं इंडिजने श्रीलंकेचा ६ विकेट्सने सहज पराभव केला. गेलने १०० चेंडूमध्ये १०९ धावांची आक्रमक खेळी केली. त्याखमुळे श्रीलंकेच्या गोलंदाजांची हवाच निघून गेली. इंडिजने हा सामना गेलच्या जीवावर सहज जिंकला.
वेस्ट इंडिजमध्ये सुरु झालेल्याघ तिरंगी मालिकेतील पहिला सामना जमैका येथे झाला. वेस्टय इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. माहेला जयवर्धेने आणि उपुल थरंगा या जोडीने ६५ धावांची सलामी दिली. त्यानंतर एकाही फलंदाजाला स्थिरावल्यानंतर मोठी खेळी करता आली नाही.
श्रीलंकेचा संघ ४८.३ षटकांमध्ये २०८ धावांमध्येथ गारद झाला. सुनील नारायणने ४ तर रवि रामपॉलने ३ बळी घेऊन दमदार कामगिरी केली. माहेला जयवर्धेनेने ५२ तर कर्णधार एंजेलो मॅथ्युरजने नाबाद ५५ धावांची खेळी केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.