www.24taas.com, झी मीडिया, नोएडा
रेड बुल ड्रायव्हर सेबेस्टियन व्हेटेलने इंडियन ग्राँप्री जिंकण्याची हॅटट्रिक साधत सलग चौथ्यांदा ड्रायव्हर्स चॅम्पियनशीपवर नाव कोरण्याची किमया साधली. अशी कामगिरी करणारा तो सर्वात यंगेस्ट ड्रायव्हर ठरला आहे... त्याच्या या कामगिरीमुळे रेड बुल टीमने कंस्ट्रक्टर्स ड्रायव्हर्स चॅम्पियनशीपवरही सलग चौथ्यांदा कब्जा केला आहे.
नोएडा येथील बुद्ध सर्किटवर इंडियन ग्राँप्री रेसला सुरूवात होण्यापूर्वीच सेबेस्टियन व्हेटेलचं ड्रायव्हर्स चॅम्पियनशीप सेलिब्रेट करण्यासाठी तयारी सुरू झाली होती... आणि रेड बुल ड्रायव्हर व्हेटेलनेही आपला फॉर्म कायम राखत सलग तिस-यांदा इंडियन ग्राँपी जेतेपदावर नाव कोरलं... त्याच्या या विजयासह त्याने सलग चौथ्यांदा ड्रायव्हर्स चॅम्पियनशीपचा खिताबही आपल्या नावे केला... पोल पोझिशन मिळवलेल्या व्हेटेलने सुरूवातीपासून आपली आघाडी कायम राखली आणि 68 लॅप्सची ही रेस 1 तास 31 मिनिटे आणि 12 सेकंदांची वेळ देत व्हेटलने विजेतेपद संपादित केलं... त्याच्या पाठोपाठ मर्सिडिज ड्रायव्हर निको रोसबर्ग याने सेकंड तर लोटन रेनॉल्टचा ड्रायव्हर रोमेन ग्रोसजेन याने तिसरी पोझिशन मिळवली... फेरारी ड्रायव्हर फर्नांडो अलोन्सोला मात्र 11व्या स्थानी समाधान मानावं लागलं... सेबेस्टियन व्हेटलेच्या या जेतेपदामुळे त्याची रेड बुल टीमलाही फायदा झाला आहे... व्हेटेल आणि मार्क वेबरच्या तुफानी कामगिरीमुळे सलग चौथ्यांदा कन्सट्रक्टर्स चॅम्पियनशीपचा खिताब रेड बुलच्या नावे झाला आहे... व्हेटलने या सीझनमध्ये इंडियन ग्रांप्रीसह सलग सहा रेसेस जिंकण्याचाही पराक्रम केला आहे... सलग चार वेळा ड्रायव्हर्स चॅम्पियनशीप जिंकणारा सर्वात यंगेस्ट ड्रायव्हरही तो ठरला आहे.
याआधी मायकल शुमाकर आणि मॅन्युएल फँगिओलाच सलग चारवेळा ड्रायव्हर्स चॅम्पियनशीप मिळवता आली आहे. या सीझनची सांगता होण्यास अजून तीन रेसेस बाकी आहेत... त्याआधीच त्याच्या खात्यात एकुण 10 रेस जिंकण्याची नोंद झाली आहे... त्यामुळे व्हेटेलला मायकल शुमाकरने 2003मध्ये रचलेल्या 13 रेस जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची नामी संधी आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.