कॅप्टन धोनीचं द्विशतक!

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध डबल सेंच्युरी झळकावली आहे. त्यानं टेस्ट करिअरमधील पहिली-वहिली डबल सेंच्युरी पूर्ण केली आहे. टेस्ट सिरीजमध्ये डबल सेंच्युरी करणारा धोनी हा पहिला भारतीय कॅप्टन आहे. तसंच धोनी हा पहिला विकेटकीपर आहे, ज्याने डबल सेंच्युरी केली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 24, 2013, 05:43 PM IST

www.24taas.com, चेन्नई
टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध डबल सेंच्युरी झळकावली. त्यानं टेस्ट करिअरमधील पहिली-वहिली डबल सेंच्युरी पूर्ण केली आहे. धोनीनं कांगारु बॉलर्सवर जोरदार हल्ला चढवला आणि ऑस्ट्रेलियन बॉलर्सना सळो की पळो करून सोडलं. त्याच्या स्फोटक खेळीमुळेच टीम इंडियाला चेन्नई टेस्टवर आपली पकड मजबूत करण्यात यश आलं आहे. माहीनं नॉटआऊट 206 रन्सची कॅप्टन्स इनिंग खेळली आहे.
कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं आपल्या स्फोटक बॅटिंग क्रिकेटप्रेमींना आपल्या फिअरलेस बॅटिंगची स्पेशल ट्रीट दिली. त्यानं आपल्या टेस्ट करिअरमधील पहिली-वहिली डबल सेंच्युरी झळकावली. डबल सेंच्युरी ठोकणारा तो पहिला भारतीय विकेटकीपर ठरला. तर भारतीय कॅप्टन म्हणूनही त्यानं टेस्टमध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा रेकॉर्डही केला. त्याचप्रमाणे माहीनं टेस्ट क्रिकेटमध्ये आपले 4 हजार रन्सही पूर्ण केले. धोनीनं कॅप्टन्स इनिंग खेळत कांगारु बॉलर्सना चांगलाच तडाखा दिला. ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी माहीला टाकलेला बॉल हा सीमापार जातांना पाहाण्यावाचून ऑस्ट्रेलियन फिल्डर्सना गत्यंतर नव्हतं. धोनीच्या या स्फोटक इनिंगमुळे टीम इंडियानं चेन्नई टेस्टवर वर्चस्व मिळवलं. विराट कोहली सेंच्युरी झळकावल्यार पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्यानंतर भारताची इनिंग सावरण्याची आवश्यकता होती. धोनीनही विराट आऊट झाल्यानंतर गिअर चेंज केला. आणि कांगारु बॉलर्सची चांगलीच धुलाई केली. उत्तुंग सिक्स हे धोनीच्या इनिंगचं ख-याअर्थानं वैशिष्ट्य ठरलं.
महेंद्रसिंग धोनीनं 243 बॉल्समध्ये 22 फोर आणि 5 सिक्सच्या सहाय्यानं 206 रन्सची नॉटआऊट इनिंग खेळली. माहीच्या या फिअरलेस बॅटिंगमुळेच टीम इंडियाला चेन्नई टेस्टवर आपली पकड मजबूत करण्यात यश आलं.

महेंद्रसिंग धोनीनं चेन्नईच्या मैदानावर अनेक विक्रमांना गवसणी घातली. आता डबल सेंच्युरी झळकावल्यानंतर टीम इंडियाला विजय मिळवून देण्यासाठी कॅप्टन कूल आतूर