www.24taas.com, मुंबई
भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीपासून वेगाचा बादशाह उसैन बोल्टपर्यंत सर्वांनी ख्रिस गेलच्या नाबाद ६६ चेंडूत १७५ धावांच्या तुफानी खेळीला संपूर्ण आदराने सलाम केला आहे.
टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जबरदस्त खेळी खेळणाऱ्या गेलची सर्वांनी प्रशंसा करण्यात कोणतीच कसर सोडली नाही. धोनीने मस्करीचा अंदाज कायम ठेवत म्हटला की मला आनंद होतो आहे की मी गोलंदाजाऐवजी विकेटकीपर बनण्याला प्राधान्यक्रम दिला.
महेंद्रसिंग धोनी
धोनीने आपल्या ट्विटरवर ट्विट केले की, जीवन पूर्णपणे योग्य निर्णय घेण्यावर अवलंबून आहे. आज गेलची फलंदाजी पाहून मला वाटले की विकेटकीपर बनण्याचा निर्णय योग्य होता. ‘सर जडेजा सिरीज’ नंतर पुन्हा एकदा धोनीने आपला मस्करीचा अंदाज कायम ठेवला आहे.
त्याने आपल्या आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे, की जेव्हा आरसीबी बंगळुरूमध्ये खेळत असतात तेव्हा हिंदुस्थान एरोनॉटिकल्स लिमिटेड आपल्या हलक्या वजनाच्या लढाऊ विमान ‘तेजस’ चे उड्डान स्थगित करून देतात. त्यांना याची काळजी नसते की उड्डाण उशीराने होईल, थँक्स टू द ख्रिस गेल!
उसैन बोल्ट
बोल्डने ट्विट केले की, ...‘मास्टरफुल परफॉरमेन्स हेनरी गेल।’
ब्रायन लारा
वेस्टइंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने आपल्या जुन्या सहकाऱ्याबद्दल ट्वीट केले की, गेल जेव्हा फलंदाजी करतो तेव्हा क्षेत्ररक्षक दर्शक बनतात, आणि दर्शक क्षेत्ररक्षक बनतात. घऱात बसून या जबरदस्त हिटिंगचा आनंद घेत आहे.
मुथैया मुरलीधरन
बंगळुरूचा श्रीलंकन स्पीनर मुथैया मुरलीधरने म्हटले, की मी माझ्या २० वर्षांच्या कारकिर्दीत अशा प्रकारची हिटिंग पाहिली नाही. गेलने आपल्या खेळीत तीन वेळा चेंडूला स्टेडिअमबाहेर तडकावले.
डेल स्टेन
दक्षिण आफ्रिकेचा तेज गोलंदाज डेल स्टेनने म्हटले की, चेंडू बंगळुरू विमानतळापर्यंत पोहचला होता.
सुरेश रैना
सुरेश रैनानेही धोनी सारखीच मस्करी केली आहे, त्याने ट्विट केले, की आता आता चेपक मैदानावरून एक चेंडू उडाला आहे. हा चेंडू चिन्नास्वामी मैदानातून तर आला नाही ना?
शिल्पा शेट्टी
राजस्थान रॉयल्सची मालकीण शिल्पा शेट्टीने ट्वीट केला, ‘गेलची अविश्वसनीय खेळी, देवाची आभारी आहे की त्याच्या विरोधात आमची टीम खेळत नव्हती.’
रविचंद्रन अश्विन
रविचंद्रन अश्विनने ट्वीट केले की, ‘गेलच्या या कत्तलीवर सर्व फलंदाज ट्विट करतान खुश आहे. पण गोलंदाजांना गोलंदाजींच्या मशीनची गरज आहे.
डीन जोन्स
ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज डीन जोन्सने ट्वीट केले, की पुणे गेलचा शतक पूर्ण झाल्यावर गोलंदाजी संपवण्याची घोषणा करू इच्छित होते, दयेचा नियम पण लागू व्हायला हवा.
डॅरन सामी
वेस्टइंडीजचा कर्णधार डॅरन सामीने ट्वीट केले, ‘ओ माई गॉड, हेनरीगेल, तो मनुष्य नाही, तो तर त्सुनामी आहे ज्यात अणूबॉम्ब भरला आहे.