www.24taas.com, झी मीडिया, लंडन
इंग्लंडचा फिरकी गोलंदाज माँटी पानेसर याने सोमवारी येथील एका बारमध्ये मद्य प्राशन करून धिंगाणा घातला. अखेर बाउन्सरना पोलिसांना बोलवावे लागले. पण त्या बाऊन्सरवर त्याने त्याच ठिकाणी लघुशंका केल्याची बातमी द सन या वृत्तपत्राने दिली आहे.
इंग्लंडने `अॅशेस` राखल्यानंतर त्याचा आनंद साजरा करण्यासाठी पानेसर ब्रिजटन येथील बीचसमोरील एका बारमध्ये गेला होता. अर्थात, अनिर्णित राहिलेल्या तिसऱ्या कसोटीत अंतिम अकरा खेळाडूंमध्ये पानेसरचा समावेश नव्हता; पण मालिका विजय मिळल्याने पानेसर जाम खूश होता.
पानेसर रात्रभर या बारमध्ये होता. `द सन` या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, त्याच्यावर मद्याचा अंमल अधिक झाला होता. पहाटे चार वाजता एका महिला गटाने पानेसर त्रास देत असल्याची तक्रार केली. क्लबमधील बाउन्सर त्याला बाहेर काढले. नंतर पानेसरने त्यांच्यावर लघूशंका केली. अखेर पानेसर हा `अवतार` पाहून पोलिसांना बोलवण्यात आले.
पोलिसांनी त्याला सार्वजनिक ठिकाणी लघूशंका केल्याने ९० पौंड दंड केला. नंतर पानेसरने या सर्व प्रकरणाबाबत माफी मागितली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.