IPL स्पॉट फिक्सिंग : श्रीनिवासन, मयप्पन यांना क्लीन चीट

एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पान आणि राज कुंद्रा यांना क्लीन चीट मिळाली आहे. द्वीसदस्यीय समितीनं आपला अहवाल बीसीसीआयकडे सादर केला

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 28, 2013, 04:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पान आणि राज कुंद्रा यांना क्लीन चीट मिळाली आहे. द्वीसदस्यीय समितीनं आपला अहवाल बीसीसीआयकडे सादर केला.
या दोघांविरुद्ध कुठलेही पुरावे मिळाले नाहीत. आणि त्यामुळेच त्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंट आणि राजस्थान रॉयल्सविरुद्धही कुठलेही पुरावे मिळालेले नाहीत. इंडिया सिमेंटला क्लीन चीट मिळाल्यानं बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा बीसीसीआयमध्ये येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हा रिपोर्ट आता आयपीएल गव्हर्निंगकडे सोपविला जाईल. आणि यानंतर त्यावर 2 ऑगस्टला अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.