....ती बॅट ख्रिस गेलने पुण्यालाच दिली

ज्या बॅटनं पुण्याच्या टीमला धो धो धुतलं, तीच बॅट ख्रिस गेलनं पुणेकरांना भेट दिलीय. क्रिकेट शौकीन रोहन पाटे यांनी उभारलेल्या `ब्लेड्स ऑफ ग्लोरी` या अनोख्या क्रिकेट संग्रहालयाच्या वर्धापनदिनासाठी गेल पुण्यात आला होता.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 3, 2013, 09:16 PM IST

www.24taas.com, अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे
ज्या बॅटनं पुण्याच्या टीमला धो धो धुतलं, तीच बॅट ख्रिस गेलनं पुणेकरांना भेट दिलीय. क्रिकेट शौकीन रोहन पाटे यांनी उभारलेल्या `ब्लेड्स ऑफ ग्लोरी` या अनोख्या क्रिकेट संग्रहालयाच्या वर्धापनदिनासाठी गेल पुण्यात आला होता. यावेळी गेलनं क्रिकेटच्या टिप्ससह गन्नम डान्सबद्दल भरपूर गप्पा मारल्या.....
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा रांगडा गडी...रॉयल चेलेन्जर्सचा तडाखेबाज बॅट्समन...त्याचा खेळ आणि त्याची अदा, वेडावून सोडणारी... ख्रिस गेल सध्या भलताच फार्मात आहे ... बंगुळुरुतील त्याच्या धडाकेबाज नॉटआउट 175 रन्सच्या विक्रमी खेळीनं तर संपूर्ण क्रिकेटविश्व अवाक राहिलं...हाच ख्रिस गेल शुक्रवारी पुण्यात आला होता... ब्लेड्स ऑफ ग्लोरी या क्रिकेट संग्रहालयाच्या वर्धापानाचा केक त्याने कापला...ज्या बॅटनं त्यानं पुण्याविरुद्ध विक्रमी खेळी केली, तीच ऐतिहासिक बॅट त्यानं या संग्रहालयाला भेट दिली.
कोणत्याच बॉलरचं दडपण नं घेता बॉलवर तुटून पडणारा गेल खातो तरी काय असा प्रश्न आपल्याला पडतो... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा गंगन्म स्टाईल डान्स... या सगळ्यांविषयी गेल भरभरून बोलला...

गेलनं त्याचा वर्ल्ड कपचा टीशर्टही या संग्रहालयाला भेट दिला. तर मुरलीनं स्वत:च्या सहीचा बॉल भेट म्हणून दिला. या दोघांना पाहण्यासाठी पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली होती.