www.24taas.com, झी मीडिया, कार्डिफ
टीम इंडियाला पहिल्या दोन सराव सामन्यात जरी चांगला विजय मिळविता आला तरी ओपनर जोडीची चिंता कायम आहे. भारताचा स्पिनर आर. अश्विनने ही चिंता व्यक्त केली आहे.
कारण चॅम्पियन चषक स्पर्धेत ओपनर जोडीची कमतरता भासण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाच्या सामन्याच्यावेळी ५ विकेट ५५ रन्स झाल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा ते सिद्ध झाले आहे. आघाडीच्या फलंदाजांकडून निशारा होत आहे.
गेल्या शनिवारी झालेल्या श्रीलंकाविरूध्द पहिल्या सराव सामन्याप्रमाणे दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाबरोबर खेळताना टीम इंडियाची पडझड झाली. ५५ रन्सच्या बदल्यात ५ विकेट गेल्या. १७ ओव्हरमध्ये भारताला चांगली कामगिरी करता आलेली नाही. कर्णधार महेंद्रसिंग धोनी ९१ आणि दिनेश कार्तिकने सहाव्या विकेटसाठी चांगली भागिदारी करताना २११ रन्स केल्या आणि टीम इंडियाचा डाव सावरला.
भारतीय ऑफ स्पिनर आर आश्विन याने कोच डंकन फ्लेचर आघाडीच्या जोडीबाबत चिंतीत आहे, असे स्पष्ट केलं. जरी भारताला विजय मिळविला तर खेळाडूंनी आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची गरज आहे. मैदानावर चांगला खेळ केला पाहिजे, असे डंकन यांनी स्पष्ट केल्याचे आश्विन यांने सांगितले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.