ऍशेस सीरिज : ऑस्ट्रेलियाचा इंग्लडला व्हाईट वॉश

ऍशेस सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियानं इंग्लिश टीमला क्लीन स्विप दिला आहे. अखेरच्या सिडनी टेस्टमध्ये कांगारुंनी 281 रन्सनं बाजी मारली आणि प्रतिष्ठेची ऍशेस सीरिज 5-0 नं जिंकली.

Updated: Jan 5, 2014, 04:36 PM IST

ऍशेस सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियानं इंग्लिश टीमला क्लीन स्विप दिला आहे. अखेरच्या सिडनी टेस्टमध्ये कांगारुंनी 281 रन्सनं बाजी मारली आणि प्रतिष्ठेची ऍशेस सीरिज 5-0 नं जिंकली.
ऑस्ट्रेलियाची टीमनं दुस-या इनिंगमध्ये ख्रिस रॉजर्सच्या सेंच्युरीच्या जोरावर 276 रन्सपर्यंत मारली. आणि इंग्लंडसमोर 488 रन्सचं डोंगराएवढं आव्हान ठेवलं. लक्ष्याचा पाठलाग करणारी इंग्लिश टीम 166 रन्सवरच ऑल आऊट झाली.
रायन हॅरिसनं 5 विकेट्स तर मिचेल जॉन्सननं 3 विकेट्स घेतल्या. आणि नॅथन लायननं दोन विकेट्स घेतल्या. या विजयासह कांगारुंनी इंग्लिश टीमला तिस-यांदा ऍशेसमध्ये व्हाईट वॉश दिला.
याआधी 1920-21 मध्ये वार्विक आर्मस्ट्राँग नेतृत्वाखाली आणि 2006-07 मध्ये रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वाखाली अशी कामगिरी करून दाखवली होती. आणि आता मायकल क्लार्कही आर्मस्ट्राँग आणि पॉन्टिंगच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.
रायन हॅरिस मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. तर सीरिजमध्ये सर्वाधिक 37 विकेट्स घेणारा मिचेल जॉन्सन मॅन ऑफ द सीरिजचा मानकरी ठरला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.