www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
टीम इंडियाच्या `हारा`कीरीनं तुम्ही वैतागलेले असाल... पण, लवकरच भारतीय प्रेक्षकांच्या अंगावर नेहमीच रोमांच उभा करणारा असा एक सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे... हा सामना म्हणजे पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा सामना... अर्थातच भारत विरुद्ध पाकिस्तान.
क्रिकेटच्या मैदानात पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून मानले जाणारे भारत आणि पाकिस्तान दरम्यान २ मार्च रोजी `आशिया कप`मध्ये आमने - सामने येणार आहेत. २५ फेब्रुवारीपासून `आशिया कप`साठी सामने सुरु होणार आहेत. हे सामने ८ मार्चपर्यंत खेळवले जाणार आहेत. ही टूर्नामेंट बांग्लादेशची राजधानी ढाका इथल्या मैदनांवर खेळवली जाणार आहे.
या सामन्यांच्या निमित्तानं अफगानिस्तानच्या टीमला पहिल्यांदाच आशिया कपमध्ये सहभागी होण्याची संधी मिळालीय. परंतु, टूर्नामेंटचं शेड्युल आणि ढाकामध्ये असलेलं वातावरण पाहून यावेळेस पावसाची शक्यतादेखील वर्तविली जातेय.
भारत आणि पाकिस्तान दरम्यान शेवटची वनडे मॅच १५ जून २०१३ रोजी बर्मिंघममध्ये खेळली गेली होती. डकवर्थ लुइसच्या नियमांनुसार, यामध्ये भारताला विजय मिळाला होता.
आशिया कपचं वेळापत्रक (भारतीय वेळेनुसार : दुपारी २ वाजता)
२५ फेब्रुवारी : पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, फतुल्लाह
२६ फेब्रुवारी : बांग्लादेश विरुद्ध भारत, फतुल्लाह
२७ फेब्रुवारी : अफगानिस्तान विरुद्ध पाकिस्तान, फतुल्लाह
२८ फेब्रुवारी : भारत विरुद्ध श्रीलंका, फतुल्लाह
१ मार्च : बांग्लादेश विरुद्ध अफगानिस्तान, फतुल्लाह
२ मार्च : भारत विरुद्ध पाकिस्तान, मिरपूर
३ मार्च : अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका, मिरपूर
४ मार्च : बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान, मिरपूर
५ मार्च : अफगाणिस्तान विरुद्ध भारत, मिरपूर
६ मार्च : बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका, मिरपूर
७ मार्च : फायनल मॅच, मिरपूर
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.