क्रिकेटची डीआरएस सिस्टिम वादग्रस्त

`डीआरएस`सिस्टिम सध्या चांगलीच वादग्रस्त ठरत आहे. खास करुन ऍशेस सीरिजमध्ये अंपायर्स आणि `डीआरएस`द्वारे दिलेल्या निर्णय यामुळेच सीरिज गाजत आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Aug 6, 2013, 09:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मॅनचेस्टर
`डीआरएस`सिस्टिम सध्या चांगलीच वादग्रस्त ठरत आहे. खास करुन ऍशेस सीरिजमध्ये अंपायर्स आणि `डीआरएस`द्वारे दिलेल्या निर्णय यामुळेच सीरिज गाजत आहे. या वादग्रस्त निर्णयांचा ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक फटका बसला असून आता कांगारुंनी थेट आयसीसीकडेच स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असलेली प्रतिष्ठेची ऍशेस सीरिज सध्या खेळापेक्षाही वादग्रस्त निर्णयांमुळेच गाजत आहे. पहिल्या दोन्हीही टेस्टमध्ये अंपायरर्स आणि `डिआरएस`च्या वादग्रस्त निर्णयामुळे इंग्लंडचा विजय सूकर झाल्याच बोलल जात आहे. तर आता तिस-या मँचेस्टर टेस्टमध्येही अंपायर्स आणि डीआरएसमार्फत देण्यात येणा-या निर्णयांचा फटका कांगारुंना बसला आहे.
तिस-या स्थानी बॅटिंगला उतरलेल्या उस्मान ख्वाजाला एक रनवर असताना वादग्रस्तरित्या आऊट देण्यात आल. ग्रॅमी स्वानच्या बॉलवर विकेटकिपर मॅट प्रायरनं उस्मानचा कॅच घेतल्याचे इंग्लंडचे अपील ग्राऊंडवरील पंच टोनि हिल यांनी मान्य केल. यानंतर उस्माने ग्राऊंडवरील दुसरा बॅट्समन ख्रिस रॉजर्सशी चर्चा करून `डीआरएस`ची मागणी केली.
`थर्ड अंपायर` कुमार धर्मसेना यांनी रिप्ले वारंवार पाहिला आणि काहीही स्पष्ट होत नसताना धर्मसेना यांनी अंपायर्सचा निर्णय कायम ठेवला. यामुळेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयसीसीकडे ख्वाजाच्या आऊट देण्याच्या निर्णयाबाबत खुलासा मागितला आहे. पहिल्या दोन टेस्टमध्येही कांगारूंना अंपायर्सच्या निर्णयांचा फटका बसला होता. ऍशेस सीरिजच्या पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड आऊट असतानाही त्याला पंचांनी नॉट आऊट दिल होत.
तर दुस-या मॅचमध्ये इंग्लंडच्या ईयान बेल आऊट असतानाही अंपायर टोनी हिल यांनी त्याला नॉट आऊट दिल. याशिवाय ऍस्टन ऍगरना नॉट आऊट असताना हॉट स्पॉटद्वारे आऊट ठरवण्यात आल. या वादग्रस्त निर्णयांनंतर आयसीसीनेदेखील स्पष्टीकरण दिल होत. मात्र आता पुन्हा तिस-या टेस्टमध्येही वादग्रस्तरित्या ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनला आऊट दिल्यामुळे कांगारूंनीही आता कडक भूमिका घेत थेट आयसीसीकडेच स्पष्टीकरण मागीतल आहे. मात्र, तरीही क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा `डीआरएस`ला असलेला पाठिंबा कायम आहे.
याशिवाय या तंत्राच्या दर्जाबाबतही शंका उपस्थित केली जात आहे. कारण काहीवेळा रिप्लेमध्येही बॅट्समन आऊट आहे की नाही एवढे स्पष्ट चित्र त्यात दिसत नाही. यामुळे अनेकदा थर्ड अंपायरदेखील वादग्रस्त निर्णय देतो. अशा प्रकारच्या वादग्रस्त निर्णयांमुळेच `डीआरएस`सिस्टिम कितपत योग्य आहे हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.