लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसले विराट आणि अनुष्का

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतोय. दोघेही लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसले.

Updated: Aug 8, 2016, 12:34 PM IST
लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसले विराट आणि अनुष्का title=

लंडन : भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतोय. दोघेही लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसले.

दोघांची खास गोष्ट म्हणजे दोघांनी ही मॅचिंग ड्रेस घातला होता. फरक फक्त जॅकेटचा आहे. अनुष्काने क्रीम तर विराटने काळ्या रंगाचा जॅकेट घातला आहे.

अनुष्का लवकरच इम्तियाज अलीच्या सिनेमाच्या शूटिंगसाठी यूरोपला जाऊ शकते. या सिनेमात तिच्यासोबत शाहरुख खान मुख्य भूमिकेत असणार आहे.