www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
स्पॉट फिक्सिंगप्रकऱणी अटक करण्यात आलेल्या अंकित चव्हाणसह तीन बुकींना ४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, अंकित चव्हाण आणि एस. श्रीशांतनं जामीनासाठी अर्ज केला आहे.
अंकितचा २ जुनला विवाह आहे. त्याच्या जामीन अर्जावर २८ मेला सुनावणी होणार आहे. तर एस. श्रीशांत आणि अजित चंडिलाची पोलीस कोठडी आणखी दोन दिवसांनी वाढवली आहे.
स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पाकिस्तानी अंपायर असद रौफ यांचही नाव आहे. आतातर बुकी संजय जयपूरन रौफ यांना लाखोंच्या भेटवस्तू दिल्याचं समोर आलय. अंपायर रौफ यांना आदिदास नायकीचे सहा शूज दिले होते.
एका शूजची किंमत ही जवळपास १५ हजार रुपये होती. तर आठ लेदर शूजही त्यांना भेट म्हणून दिले होते. एका शूजची किंमत ही १० ते १५ हजार रुपये होती. तर लेविस, हेलोज आणि बॅरन या नामांकित ब्रँडच्या १३ जीन्सही त्यांना देण्यात आल्या होत्या.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.