www.24taas.com, पीटीआय, जोहान्सबर्ग
जोहान्सबर्ग वन-डेत टीम इंडियाला 141 रन्सने दारुण पराभव सहन करावा लागला. दक्षिण आफ्रिकेच्या तेज तर्रार बॉलिंग लाईनअपसमोर धोनीच्या युवा ब्रिगेडनं अक्षरक्ष: नांगी टाकली. घरच्या मैदानाव ज्या बॅट्समननी खो-यानं रन्स केलं. तेच बॅट्समननी आफ्रिकन बॉलर्ससमोर सपशेल लोटांगण घातलं. या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं तीन वन-डे मॅचेसच्या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे.
भारतीय टीमचा दक्षिण आफ्रिका दौरा हा हा अतिशय खडतर असणार हे सर्वांनाच माहित होतं. आफ्रिकेच्या तेज तर्रार पिचवर बॅटिंग करणं टीम इंडियाच्या बॅट्समनसाठी अतिशय कठीण जाणार याचीही कल्पना होती. वन-डे सीरिजच्या पहिल्याच मॅचमध्ये हेच चित्र पाहायला मिळालं. सहा फास्ट बॉलर्स घेऊन आफ्रिकन टीम मैदानात उतरली होती.
वॉन्डरर्स स्टेडियमवर सहा आफ्रिकन बॉलर्सच्या आग ओकणा-या बॉलिंगचा सामना धोनीच्या यंगिस्तानला करायचा होता. शिखर धवन आणि रोहित शर्मा ही हिट जोडी मैदानात होती. मात्र, आफ्रिकन बॉलर्ससमोर ही जोडी सुपर फ्लॉप ठरली. रनमशिन विराट कोहलीही काहीच कमाल करू शकला नाही. भारताचे पाच बॅट्समन 108 रन्सवरच पॅव्हेलियनमध्ये परतले होते. आणि तिथेच भारताचा पराभव निश्चित झाला होता. कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं 65 रन्स करत थोडीफार प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. मात्र, 359 रन्सचं डोंगराएवढ टार्गेट पार करणं अशक्य होतं.
डेल स्टेन आणि रायन मॅक्लेरननं भारतीय बॅट्समनची दाणादाण उडवून टाकली. आणि भारतीय टीम 217 रन्सवर ऑलआऊट झाली.
तत्पूर्वी, टीम इंडियाने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॉलर्स फ्रेंडली विकेट असल्यानं भारत आफ्रिकेला सुरुवातीलाच धक्के देईल असं वाटत होतं. मात्र, मात्र, अनुभवी हाशिम आमला आणि युवा डी कॉक ही जोडी चांगली जमली. आमला-कॉक जोडीनं 152 रन्सची दमदार ओपनिंग दिली. युवा कॉकनं वन-डे करिअरमधील दुसरी सेंच्युरीही झळकावली. यानंतर कॅप्टन एबी डिव्हिलियर्स आणि जे.पी. डुमिनीनं जोरादार फटकेबाजी करत आफ्रिकेला 358 रनस्पर्यंत मजल मारुन दिली.
घरच्या मैदानावर साडेतीनशे रन्सहून अधिक रन्सचं टार्गेट पार करणा-या भारतीय बॅट्समन आफ्रिकन बॉलर्ससमोर तग धरु शकले नाही. आपल्या पहिल्याच मॅचमध्ये मानहानिकारक पराभव सहन करावा लागल्यानं आता सीरिजमध्ये कमबॅक करण्य़ासाठी धोनी अँड कंपनीला चांगलेच कष्ट करावे लागणार आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.