इस्लाम आणि कट्टरतेवर आधारित ` या रब ` लवकरच ...

` या रब ` हा महेश भट्टचा नवीन चित्रपट ७ फेब्रुवारीला रिलीज होतोयं. जिहाद अगेनस्ट टेरेरिझम ही या चित्रपटाची कॅचलाइन आहे. इस्लाम धर्माच्या समकालीन दोन विचारप्रणालीवर आधारीत हा चित्रपट आहे.

Updated: Feb 2, 2014, 05:07 PM IST

www.24tass.com , झी मीडिया , मुबंई .
` या रब ` हा महेश भट्टचा नवीन चित्रपट ७ फेब्रुवारीला रिलीज होतोयं. जिहाद अगेनस्ट टेरेरिझम ही या चित्रपटाची कॅचलाइन आहे. इस्लाम धर्माच्या समकालीन दोन विचारप्रणालीवर आधारीत हा चित्रपट आहे.

एक विचारधारा मुसलमानांना त्यांच्याशी झालेल्या अन्यायामुळे कट्टरतेकडे घेउन जाते तर दुसरी विचारधारा मानवता आणि सहिष्णुतेकडे मुस्लीम समाजाला नेते. त्यापैकी मानवी प्रेम आणि माणुसकीचा संदेश देणारा हा चित्रपट आहे.
चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत इमरान हस्नी हा अभिनेता असणार आहे. आपल्या चित्रपटाबाबत इमरान हस्नी फारच संवेदनशील मत व्यक्त करतोय. तथाकथीत इस्लामचे तारणहार आणि त्यांच्या स्वार्थामुळे सामान्य मुसलमानांचे होणारं नुकसान यावर हा चित्रपट प्रकाश झोत टाकतो.
चित्रपटाची कथा अत्यंत साधी सरळ आहे. पवित्र कुराण कधीही कट्टरतेचा संदेश नाही. आपल्याला जेव्हा माणुसकीचा विसर पडतो. तेव्हा धर्मच आपल्याला माणुसकीची शिकवण देतो, असं मत इमरानने व्यक्त केलयं. तो या चित्रपटात जिहादी दहशतवाद्याच्या भूमिकेत आहे.

या चित्रपटाच्या प्रसिद्धीची जबाबदारी महेश भट्ट स्वतः उचलणार आहेत. विशेष फिल्मस् या कंपनीचा हा चित्रपट आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन हसनैन हैद्राबादवालाने केलं आहे.हसनैन हैद्राबादवालाने यापूर्वी द ट्रेन , द किलर या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं होत.
एजाज खान, अजरुमन मुगल, राजु खेर, विक्रम सिंह, इमरान हस्नी हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.
इमरान हस्नीचे आणखी दोन चित्रपट लवकरच रिलीज होणार आहेत. सुभाष घईंचा कांची आणि लालबहादुर शास्त्रींच्या जीवनावर आधारीत जय जवान जय किसान या चित्रपटात इमरानची प्रमुख भूमिका असणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.