www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
बॉलिवूडचे दबंग खान सलमानचं लग्न म्हणजे राष्ट्रीय चर्चेचा विषय असतो. प्रत्येक व्यक्ती सलमान कोणासोबत लग्न करणार आहे याची उत्सुकता लागलेली आहे. याबाबतच आता एक महत्त्वाची बातमी येतेय. ती म्हणजे सलमान खान येत्या काही दिवसात आपल्या लग्नाची घोषणा करू शकतो. एका मीडिया कटन्क्लेवमध्ये सलमाननं तसे संकेत दिले आहेत.
४८ वर्षीय अभिनेता सलमान रोमानियाची लूलिया वान्तुर हिच्यासोबत विवाह करू शकतो. मागील काही काळापासून सलमान लुलियासोबत डेटिंग करतोय.
सलमान म्हणाला,"आता मी संक्रमण काळात आहे, असं मला वाटतंय. वयाच्या १५ वर्षापासून मला यात बदल जाणवला नाही. आता पहिल्यांदा मला ही संधी मिळालीय आणि मागील अडीच वर्षांपासून मी काही बदल अनुभवतोय.यापुढं बदलांबाबत चर्चा करणं बंद करावं लागेल कारण आता लवकरच माझ्या आयुष्यात मोठा बदल घडणार आहे."
सलमान पुढं म्हणाला, मी मानवता हाच एक धर्म मानतो. मुस्लिम, ख्रिश्चन असे धर्मभेद मला मान्य नाही. मी नेहमी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो. मी खूप भाग्यशाली आहे. माझे वडील पठाण, आई हिंदू, दुसरी आई ख्रिश्चन आहे. माझे जीजाजी पंजाबी आहे आणि बायको बाहेरून आणण्याचा विचार करतोय.
सल्लूमियाँचं नाव नेहमीच अनेक हिरोईनसोबत जोडल्या गेलंय. आपल्या प्रेयसीवर खूप दबाव टाकणारा प्रियकर अशी सलमानची प्रतिमा आहे. सलमान स्वत: हे मान्य करतो की तो खूप वाईट प्रियकर आहे. त्यावर सलमान म्हणतो, जेव्हा तुम्ही एका नात्यात असता, तेव्हा हे नक्की करतो की त्या व्यक्तीसाठी मी काहीही करू शकतो. तुम्ही चांगलं वागण्याचा प्रयत्न करता, तुम्ही चुप राहता, ओरडता आणि रडताही. मात्र जेव्हा कशाचाही उपयोग होत नाही तेव्हा तुम्ही त्याला जावू देता.
सलमाननं दिलेले हे संकेत हेच सांगतायेत की सल्लूमियाँ लवकरत विवाहबंधनात अडकणार आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.