बिपाशाचं नाव ऐकलं आणि जॉन धावत सुटला!

आपल्या दीर्घकालीन नातेसंबंधांसाठी आणि नंतर अचानक झालेल्या ब्रेकअपसाठी एकत्र झळकलेले जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू सध्या एकमेकांचं तोंडही पाहणं टाळतात.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 1, 2013, 09:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आपल्या दीर्घकालीन नातेसंबंधांसाठी आणि नंतर अचानक झालेल्या ब्रेकअपसाठी एकत्र झळकलेले जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू सध्या एकमेकांचं तोंडही पाहणं टाळतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय.
एका वर्तमानपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, बॉलिवूडचा नवा दम जॉन अंधेरीच्या एका नामांकीत रेस्टोबारमध्ये एका मिटींगसाठी गेला होता. आणि त्याला बिपाशाही तिथंच असल्याचं समजलं. योगायोग म्हणजे बिपाशाही यावेळेस आपल्या एका मित्रासोबत डिनरसाठी याच ठिकाणी आली होती.
‘शूटआऊट अॅट वडाला’च्या या स्टारचा चेहरा मात्र बिपाशाला पाहिल्यानंतर पडला. आपण उपस्थित असलेल्या ठिकाणी बिपाशाही आहे हे कळल्यावर त्याचा मूडच बदलला. त्याचं लक म्हणा किंवा काहीही, पण त्याला मोबाइलवर एक कॉल आला आणि त्याला इथून बाहेर पडण्याची संधी बदलली.
सूत्रांच्या माहितीनुसार, जॉनला जेव्हा काही ‘एस्क्युझ’द्यायचं असेल आणि एखाद्या ठिकाणामधून बाहेर पडायचं असेल तेव्हा तो कॉलचा बहाणा बनवतो.
जॉन आणि बिपाशा एकमेकांना २००२ साली पुजा भट्टच्या ‘जिस्म’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान भेटले होते. त्यानंतर ते एकमेकांच्या गाढ प्रेमात होते. पण, तब्बल नऊ वर्षांनी कुठेतरी माशी शिंकली आणि २०११ दोघांनी आपापले मार्ग वेगळे असल्याचं जाहीरपणे सांगितलं.

ब्रेकअप अगोदर मीडियानं तर या दोघांना सुपर-कपलचा खिताब बहाल करून टाकला होता. पण, जॉनचं सध्या एका यूएसला शिकत असलेल्या फायनान्शिअल अॅनालिस्ट आणि इन्व्हेस्टमेंट बँकर, प्रिया रुंचाल हिच्याशी सूत जुळलंय. प्रिया आणि जॉन यांची दोघांची डिसेंबर २०१० मध्ये मुंबईत भेट झाली होती.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.