आदित्य- सुशांतमध्ये बिनसलं?

बॉलिवूडमध्ये दोन कलाकारांमधील स्पर्धा तर आपल्याला माहितीच आहे. मात्र चांगले मित्र असलेल्या आदित्य रॉय कपूर आणि सुशांत सिंग राजपूत यांच्यात शुल्लक कारणावरुन भांडण झाल्याचं कळतंय. नुकतंच आदित्यनं सुशांतला एका चित्रपटात रिप्लेस केलंय, यामुळंच हे भांडण झालं असं सांगण्यात येतंय. या दोघांमध्ये आता शीतयुद्ध सुरू झालंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 27, 2014, 02:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया , मुंबई
बॉलिवूडमध्ये दोन कलाकारांमधील स्पर्धा तर आपल्याला माहितीच आहे. मात्र चांगले मित्र असलेल्या आदित्य रॉय कपूर आणि सुशांत सिंग राजपूत यांच्यात शुल्लक कारणावरुन भांडण झाल्याचं कळतंय. नुकतंच आदित्यनं सुशांतला एका चित्रपटात रिप्लेस केलंय, यामुळंच हे भांडण झालं असं सांगण्यात येतंय. या दोघांमध्ये आता शीतयुद्ध सुरू झालंय.
मिळालेल्या माहितीनुसार `काय पो चे`चा स्टार सुशांत राजपूत यानं त्याचे गुरू अभिषेक कपूर यांच्या आगामी `फितूर` या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. कारण त्याच्या तारखा जुळत नव्हत्या. सुशांतनं शेखर कपूर यांच्या `पाणी` या चित्रपटाच्या तारखा तेव्हाच घेतल्यायेत. त्यामुळं अर्थातच डिस्नी यूटीव्हीचा हेड असलेला सिद्धार्थ रॉय कपूर नाराज झाला. सिद्धार्थ कपूरचा आदित्य कपूर हा धाकटा भाऊ आहे.
सुशांतच्या या निर्णयानंतर आदित्य आणि सुशांत एकमेकांना टाळतांना दिसू लागले. हे दोन्ही कलाकार YRF moviesच्या चित्रपटांसाठी काम करतायेत. मात्र त्या दोघांमधला तणाव दिसून येतोय. जेव्हा सुशांतनं आदित्यचं `आशिकी-२`साठी अभिनंदन केलं. तेव्हा तो धावत आला होता. मात्र आता दोघंही एकमेकांपासून दूर पळतांना दिसतात.
सुशांत राजपूत सध्या `ब्योम्केश बक्शी`साठी आणि आदित्य कपूर `दावत-ए-इश्क` या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.