बिप्सनं ‘राज ३’चं यश चाखलंच नाही...

अभिनेत्री बिपाशा बासू हिचा ‘राज ३’ नुकताच प्रदर्शित झालाय. बॉक्स ऑफिसवर या सिनेमानं बऱ्यापैकी यशही मिळवलंय. पण, बिचारी बिप्स मात्र या सिनेमाचं यश सेलिब्रेट करू शकली नाही.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 13, 2012, 05:46 PM IST

www.24taas.com, मुंबई
अभिनेत्री बिपाशा बासू हिचा ‘राज ३’ नुकताच प्रदर्शित झालाय. बॉक्स ऑफिसवर या सिनेमानं बऱ्यापैकी यशही मिळवलंय. पण, बिचारी बिप्स मात्र या सिनेमाचं यश सेलिब्रेट करू शकली नाही.
‘व्हायरल इन्फेक्शन’चा ताप चढल्यामुळे बिपाशाला हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आलंय. तिची तब्येत आता व्यवस्थित आहे. बिप्सची तब्येत बिघडली हे समजल्यानंतर तिच्या अनेक चाहत्यांना तिची काळजी लागली होती त्यांच्यासाठी बिपाशानं ट्विटरवर लिहलंय, ‘माझी चिंता करणाऱ्या लोकांना मला सांगावसं वाटतंय की माझी तब्येत आता पहिल्यापेक्षा चांगलीच सुधारलीय. थोडी थकावट आणि थोडा तापही आहे’.
आजारी पडलेल्या बिपाशाला ‘राज थ्री’च्या यशाचं सेलिब्रेशन न करता आल्यामुळे ती थोडी खंत व्यक्त करताना म्हणतेय ‘राज थ्री हा सिनेमा चांगला चाललाय. माझ्या कामाबद्दल चांगल्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतेय आणि मी खूप खूशही आहे. बरी झाल्यानंतर लवकरच मी राज थ्रीचं यशही सेलिब्रेट करणार आहे’.
आपणही आपल्या लाडक्या बिप्सला म्हणूयात, ‘गेट वेल सून बेबी!’