www.24taas.com, मुंबई
दबंगगर्ल सोनाक्षीनं आपल्या पदार्पणातच दबंग आणि राऊडी राठोड या शंभर कोटींच्या घरात कमाई करणाऱ्या फिल्म्समधून आपली छाप उमटवलीय. पण इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता तसंच इथं प्रत्येकाला खूश ठेवणं केवळ अशक्य असल्याचं सोनाक्षीला वाटतंय.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिनं बॉलिवूडमध्ये आपलं पाऊल टाकलं आणि स्वत:चं एक स्थानही निर्माण केलंय. आपल्या करिअरच्या पदार्पणातच तिनं सलमान खान, अक्षय कुमार आणि अजय देवगणबरोबर १०० करोडोच्या फिल्म्समध्ये एन्ट्री मारली. त्यामुळे ती स्वत:ला अतिशय भाग्यवान समजतेय. पण, इतक्या कमी वयात आणि बॉलिवूडमधल्या रस्सीखेचीमध्ये मोठ्या कलाकारांसोबत काम करणं आणि प्रत्येकाला खूश ठेवणं मात्र कठिण असल्याचं सोनाक्षी म्हणतेय.
‘प्रेक्षकांच्या माझ्याकडून फार अपेक्षा आहेत… त्या पूर्ण करण्याचा आणि प्रत्येक भूमिकेमध्ये काहीतरी वैविध्यपूर्णता आणण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. पण, या सगळ्या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नाहीत. त्यासाठी मला अतिशय मेहनत करावी लागणार आहे’ असं सोनाक्षीनं म्हटलंय आणि त्यासाठी तयारीही दर्शवलीय. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरच सोनाक्षीचा ‘सन ऑफ सरदार’ हा सिनेमा रिलीज होतोय.