३१ ला सनी लिऑन देणार प्रथमच लाईव्ह परफॉर्मंस

पॉर्न स्टार सनी लिऑन याबद्दल बोलताना म्हणाली, “मी यंदा प्रथमच लोकांसमोर लाईव्ह परफॉर्म करणार आहे... ते ही लोकांच्या खूप मोठ्या जमावासमोर. मला या गोष्टीचा खूप आनंद होतोय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 20, 2012, 03:56 PM IST

www.24taas.com, मुंबई
31 डिसेंबर म्हणजे जशी सामान्य लोकांसाठी पर्वणी असते, तशीच ती सेलिब्रिटींसाठीही पर्वणीच असते. कारण 31 डिसेंबर रोजी वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये, सोहळ्यांमध्ये परफॉर्म करण्यासाठी सेलिब्रिटींना अनेक ऑफर्स येतात. काही वेळाच्या परफॉर्मंससाठी या कलाकारांना करोडो रुपये मिळतात. मात्र यावर्षी आघाडीच्या कलाकारांनी 31 डिसेंबरला डान्स परफॉर्मंसेसकडे पाठ फिरवल्यामुळे नव्या चेहऱ्यांना चांगलीच मागणी आहे.
यंदा करीना कपूर, कतरिना कैफ यांसारख्या आघाडीच्या नायिकांनी करोडो रुपयांच्या ऑफर्स नाकारल्या आहेत. त्यामुळेच परिणिती चोप्रा, समीरा रेड्डी, अंजना सुखानी, अर्जुन कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन यांसारख्या नवोदित तसंच फारशा प्रसिद्ध नसलेल्या कलाकारांचा भाव चांगलाच वधारला आहे.
पॉर्न स्टार सनी लिऑन याबद्दल बोलताना म्हणाली, “मी यंदा प्रथमच लोकांसमोर लाईव्ह परफॉर्म करणार आहे... ते ही लोकांच्या खूप मोठ्या जमावासमोर. मला या गोष्टीचा खूप आनंद होतोय. मी आतापर्यंत कधीच असं लोकांसमोर परफॉर्म केलं नाही.” दिल्लीमध्ये होणाऱ्या या परफॉर्मंससाठी सनीला 1 कोटी रुपयांची ऑफर दिली गेली असल्याचं म्हटलं जातंय.

परिणिती चोप्राला विचारलं असता ती म्हणाली, “मी तर थर्टी फर्स्टसाठी पुरेपूर तयार आहे. या दिवशी लोक खूप उत्साहात असतात. कामाचा विचार कुणी करत नसतं. अशा वेळी काही वेळ परफॉर्म करून मोठ्य़ा प्रमाणावर पैसे मिळवण्याची संधी खूप महत्वाची ठरते. मी तर यंदा माझ्या फॅमिलीला आणि मित्रांनाही माझ्यासोबत घेऊन जाणार आहे.”