शाहरुख-कतरीनाची जवळीक....

शाहरुख-कतरिना यांना घेऊन यश चोप्रा दिग्गदर्शित करत असलेला सिनेमा हा आपला आत्तापर्यंतचा सर्वाधिक रोमँटिक सिनेमा आहे, असं यश चोप्रा म्हणाले होते. सिनेमाचं आज प्रदर्शितच झालेलं पोस्चरही तशीच ग्वाही देतंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 11, 2012, 04:38 PM IST

www.24taas.com, मुंबई
शाहरुख-कतरिना यांना घेऊन यश चोप्रा दिग्गदर्शित करत असलेला सिनेमा हा आपला आत्तापर्यंतचा सर्वाधिक रोमँटिक सिनेमा आहे, असं यश चोप्रा म्हणाले होते. सिनेमाचं आज प्रदर्शितच झालेलं पोस्चरही तशीच ग्वाही देतंय. पोस्टरवर शाहरुख आणि कतरिना एकमेकांशी जवळीक साधताना दिसत आहेत. कतरीना ही सलमानची खास मैत्रीण असल्यामुळे आणि शाहरुख सलमानमधून विस्तवही जात नसल्यामुळे शाहरुख-कतरीनाचा रोमांस हा लक्षवेधी ठरत आहे.
‘जब तक है जान’ असं या बहूचर्चित आणि बहूप्रतिक्षित सिनेमाचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. आज देशातील बहुतेक सर्व मोठ्या वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठावर या सिनेमाची जाहिरात दाखवली गेली आहे. शोले सिनेमातील ‘हाँ.. जब तक है जान, जाने जहाँ.. मै नाचूंगी’ या लोकप्रिय गाण्यातील ओळच सिनेमाचं शीर्षक म्हणून घेण्यात आली आहे.
या सिनेमात शाहरुख खान आर्मी ऑफिसरची भूमिका करत आहे. तर कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यात शाहरुखच्या सहकलाकार आहेत. कतरिना कैफ आणि शाहरुख यांच्यात सिनेमादरम्यान वाढत असलेल्या जवळिकीबद्दल बरीच चर्चा रंगली होती. रोमांसचे सगळे एक्के या सिनेमात एकवटले आहेत, त्यामुळे या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या सिनेमाचं नाव आधी ‘लंडन इश्क’ असं ठेवण्यात आलं होतं, नंतर ‘यारा सिली सिली’ हे नाव ही देण्याचा विचार चालू होता. अखेर ‘जब तक है जान’ हे नाव निश्चित करण्यात आलं आहे. दिवाळीमध्ये हा सिनेमा रिलीज होईल.