सोनमने धनुषला धू धू धुतले, लगावल्या १६ थप्पड

हिंदी चित्रपटसृष्टीत धमाल उडाली आहे. अभिनेता अनिल कपूरची बेटी सोनम हिने `रांजना` या सिनेमाचा हिरो धनुषला चांगले धू धू धुतलेय. सोनमने हे का केलं त्याचं उत्तर तिच्याकडूनच कळेल. धनुषने सोनमचा मार खल्ल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 22, 2013, 05:16 PM IST

www. 24taas.com, झी मीडिया, मुंबई
हिंदी चित्रपटसृष्टीत धमाल उडाली आहे. अभिनेता अनिल कपूरची बेटी सोनम हिने `रांजना` या सिनेमाचा हिरो धनुषला चांगले धू धू धुतलेय. सोनमने हे का केलं त्याचं उत्तर तिच्याकडूनच कळेल. धनुषने सोनमचा मार खल्ल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.
धनुष हा चित्रपटाचा हिरो असला तरी तो सारखा माझ्याकडे तो माझ्याकडे पाहतो. तो माझ्याशी वारंवार बोलण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा तशीच घडना घडते. त्यामुळे तो माझ्याजवळ बोलायलाही आला तरी माझ्याकडून त्याला थप्पड मिळते, असे स्पष्टीकरण सोनम देते.
तो प्रेम करत राहतो. त्यासाठी त्याला माझी थप्पड खावी लागली, तरी त्याला ती गुलाबाच्या पाकळीप्रमाणे लागते. अशाच प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या धानुषला सोनम कपूरने एक, दोन नाही, तर तब्बल १६ वेळा थप्पड लगावली. नक्कीच चित्रपटसृष्टीत आजवर इतक्या थप्पड कोणी कोणाला दिल्या नसतील. सोनमने धनुषला एवढ्या थप्पड मारून रेकॉर्ड केला आहे.

`रांजना` हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशन्ससाठी सोनम आणि धनुष यांनी मालाड येथील इन्फिनिटी मॉलमधील रिलायन्स डिजिटलमध्ये उपस्थित होते. त्या वेळी त्यांनी चित्रपटातील अनेक आठवणींना उजाळा दिला. या वेळी सोनम म्हणाली, मी या चित्रपटात धनुषला तब्बल १६ थप्पड लगावल्या आहेत. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच इतक्याल वेळा कोणाला तरी थप्पड मारल्यात. मात्र त्याला मी एकदाही जोरात मारले नाही. नाही तर मला पुढची स्क्रीट बदलावी लागली असती.
रांजना या चित्रपटात किशोरवयापासून तारुण्यातील प्रियकराची भूमिका त्याने पेलली आहे. प्रेमाला भाषा, जात, धर्म काहीच नसते. त्यापलीकडे जाऊन प्रेमाचे बंध जुळतात; मात्र या प्रेमात अनेक अडचणी येतात. शिवाय परिस्थितीनुसार प्रेमाच्या परिभाषाही बदलतात, हेच या सिनेमात दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.