सोनाक्षीचा इंटीमेट सीन आणि सेटवर आली आई

लुटेरा चित्रपटात एका इंटीमेट म्हणजे गरमागरम सीनचे शुटिंग सुरू होते. खूपच साधेपणाने हा सीन रणवीर सिंह आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यावर चित्रीत करण्यात येत होता. या सीनमध्ये दोन्ही कलाकार एकमेकांना स्पर्शही करत नव्हते.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 28, 2013, 05:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लुटेरा चित्रपटात एका इंटीमेट म्हणजे गरमागरम सीनचे शुटिंग सुरू होते. खूपच साधेपणाने हा सीन रणवीर सिंह आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यावर चित्रीत करण्यात येत होता. या सीनमध्ये दोन्ही कलाकार एकमेकांना स्पर्शही करत नव्हते.
असा सो कॉल्ड इंटीमेट सीन सुरू असताना अचानक सोनाक्षी सिन्हाची आई पूनम सिन्हा चित्रपटाच्या सेटवर आली. त्यांना हे बिल्कुल माहीत नव्हते की सोनाक्षी अशा प्रकारे सीन करीत आहे. हा सीन पाहून त्या नाराज झाल्या नाहीत कारण यात कोणत्याही प्रकारची नग्नता किंवा अश्लिलता नव्हती.
सोनाक्षीने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की ती किसिंग सीन करणार नाही. लुटेरामध्ये अशाप्रकारचे कोणतेच दृश्य नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.