न करता`काम`, कामसूत्रमधून शर्लिनला`रामराम`

हॉट गर्ल शर्लिन चोप्राचं अभिनेत्री बनण्याचं स्वप्न आता तरी पूर्ण होईल असे दिसत नाही. न्यूड फोटोशूट करून खळबळ माजवणारी शर्लिन चोप्रा ही कामसूत्र थ्रीडी मध्ये प्रमुख भुमिका मिळाल्याने बरीच उत्साही होती.

Updated: Feb 6, 2013, 05:35 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
हॉट गर्ल शर्लिन चोप्राचं अभिनेत्री बनण्याचं स्वप्न आता तरी पूर्ण होईल असे दिसत नाही. न्यूड फोटोशूट करून खळबळ माजवणारी शर्लिन चोप्रा ही कामसूत्र थ्रीडी मध्ये प्रमुख भुमिका मिळाल्याने बरीच उत्साही होती. मात्र आता असं होणार नाही. एका रिपोर्टनुसार कामसूत्र सिनेमाच्या निर्मात्याने शर्लिन चोप्राला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आता या सिनेमासाठी हॉलिवूडची अभिनेत्री इवा लोगोरिया किंवा मिला कुनीसला घेण्याचा विचार केला जात आहे. त्यामुळे या दोन अभिनेत्रीपेकी कोणीतरी एक शर्लिनची जागा घेणार आहे.
कामसूत्र थ्रीडी दिग्दर्शक रूपेश पालने शर्लिनला सिनेमातून काढण्याचा निर्णय घेतला आहे. याचं कारण असं की, शर्लिनच्या अनेक कारनाम्यांमुळे किंवा त्याला कंटाळून तो तिच्यावर चांगलाच नाराज झाला. शर्लिनने ह्या सिनेमाशी निगडीकत एका न्यूड फोटोशूटचा व्हिडिओ तिच्या स्वत:च्या यूट्यूब चॅनेलवर टाकलं. त्यामुळे दिग्दर्शक नाराज झाला आणि त्यांने तिला सिनेमातून काढून टाकले. त्यामुळे शर्लिनचे जलवे मात्र आता या सिनेमात दिसणार नाहीत.
पण दिग्दर्शकाच्या या निर्णयाने शर्लिन मात्र चांगलीच चवताळून उठली... आणि तिने तिचा राग ट्विटरवर व्यक्त केला. शर्लिनने ट्विट केले की, ‘मि. पाल यांना मिला किंवा इवाला जर या सिनेमात घ्यायचे होते तर मला का साईन केले होते?’ ‘तेव्हा काय मिला किंवा इवाकडे तारखा नव्हत्या? कामसूत्र फोटोशूटच्या व्हिडिओसाठी शर्लिन चोप्रा आणि सिनेमासाठी इंग्रजी नटी.. वा क्या बात है... घर की मुर्गी दाल बराबर होती है...’ अशाप्रकारे तिने आपला राग व्यक्त केला.