रुपेशने दिलेला सेक्सचा प्रस्ताव मी धुडकावला म्हणून...

बॉलिवूडची हॉट गर्ल शर्लिन चोपडा ही पुन्हा एकदा चर्चेत आलीय. यावेली शर्लिन चोपडा हिनं कामसूत्र - थ्रीडीचा दिग्दर्शक रुपेश पॉल याच्यावर गंभीर आरोप केलेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 29, 2014, 05:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडची हॉट गर्ल शर्लिन चोपडा ही पुन्हा एकदा चर्चेत आलीय. यावेली शर्लिन चोपडा हिनं कामसूत्र - थ्रीडीचा दिग्दर्शक रुपेश पॉल याच्यावर गंभीर आरोप केलेत.
शर्लिन हिच्या म्हणण्यानुसार, `कामसूत्र - थ्रीडी` या सिनेमातून तिला चुकीच्या पद्धतीनं हटवण्यात आलंय. रुपेश पॉल यानं केलेली शरीर संबंधाची मागणी धुडकावून लावल्यामुळे तिला या सिनेमातून बाजुला केलं गेलं, असं तिनं म्हटलंय.
एव्हढच नव्हे तर शर्लिन चोपडा हिनं सिने-दिग्दर्शक रुपेश पॉल याच्याविरुद्ध एफआयआरदेखील नोंदवलीय. तिनं यासंबंधी मुंबई पोलीस अतिरिक्त आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना पत्र पाठवलंय. तसंच याचसंबंधी तिनं सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये रुपेश पॉल यांच्याविरुद्ध फसवणूकची तक्रार दाखल केलीय. शर्लिन हिनं पोलिसांना रुपेशविरुद्ध कारवाई करण्याचा आग्रह केलाय.
`पॉलनं समोर ठेवलेल्या शरीरसंबंधाच्या प्रस्तावाला धुडकावल्यानंतर त्यानं दुसऱ्या एखाद्या मुलीला शर्लिन हिच्या जागी घेण्याचं तसंच तिचं न्यूड फुटेज आंतरराष्ट्रीय स्तरावर सार्वजनिक करण्याची धमकी दिली होती` असं शर्लिननं आपल्या पत्रात म्हटलंय. सोबतच, रुपेश पॉल यानं आपल्याला अश्लील मेल पाठवल्याचंही तिनं म्हटलंय.
काही दिवसांपूर्वी शर्लिन हिनं कामसूत्र - थ्रीडी सोडल्याचं सांगितलं होतं. या सिनेमाचं शूटींग पूर्ण झालंय. तसंच हा सिनेमा लवकरच रिलीज होण्याच्या मार्गावर आहे, असंही म्हटलं जातंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.