`चेन्नई एक्सप्रेसनं गेल्या २० वर्षांची भरपाई केलीय`

बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि दीपिका पादुकोन अभिनित आणि रोहित शेट्टी निर्मित ‘चेन्नई एक्सप्रेस’नं कमाईमध्ये आत्तापर्यंतचे सगळ्याच रेकॉर्डला धूळ चारलीय. याचमुळे किंग खान भलताच खूश आहे. गेल्या २० वर्षांची भरपाई या एकट्या सिनेमानं केलीय, असं शाहरुखनं म्हटलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 27, 2013, 02:06 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि दीपिका पादुकोन अभिनित आणि रोहित शेट्टी निर्मित ‘चेन्नई एक्सप्रेस’नं कमाईमध्ये आत्तापर्यंतचे सगळ्याच रेकॉर्डला धूळ चारलीय. याचमुळे किंग खान भलताच खूश आहे. गेल्या २० वर्षांची भरपाई या एकट्या सिनेमानं केलीय, असं शाहरुखनं म्हटलंय.
ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘चेन्नई एक्सप्रेस’नं बॉक्स ऑफीसवर एकच धमाल उडवून दिलीय. गेल्या चार दशकांपासून आमिर खानचा ‘थ्री इडियटस्’ हा सगळ्यात जास्त कमाई करणारा सिनेमा म्हणून ओळखला जात होता. या सिनेमानं २०२.४७ करोड रुपयांची कमाई केलीय. पण, चेन्नई एक्सप्रेसनं २०२.६७ करोड रुपयांची कमाई करून आमिर खानच्या सिनेमाला मागे टाकलंय.
४७ वर्षीय शाहरुख म्हणतो, ‘गेल्या सोमवारी आणि मंगळवारी आम्हाला हा सिनेमा जबरदस्त व्यवसाय करत असल्याचं माहित पडलं. दोन दशकांच्या माझ्या करिअरची ही मिळकत आहे. माझा आत्तापर्यंतचा हा प्रवास सफल झाला असंच मला वाटलं. माझ्या चांगल्या आणि वाईट दिवसांची ही भरपाई आहे’ असं शाहरुखनं म्हटलंय. एका अभिनेत्याचं करिअर खाच-खळग्यांनी भरलेलं असतं, असंही शाहरुख म्हणतो.

‘तुम्ही एखाद्या गोष्टीला वेळ देता... त्याच्यासाठी मेहनत घेता... यावेळी अनेक चांगल्या-वाईट प्रसंगांनाही तोंड द्यावं लागतं... त्याचं योग्य वेळी फळ तुम्हाला मिळतंच जेव्हा तुमच्याकडे अशा प्रकारचा सिनेमा असेल...’ अशी भावना त्यानं व्यक्त केलीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.