www.24taas.com, झी मीडिया, पुणे
येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची आज ‘पॅरोल’वर सुटका करण्यात आलीय. १४ दिवसांची संचित रजा त्याला मंजूर करण्यात आलीय.
बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्याप्रकरणातील दोषी ठरलेल्या संजय दत्तनं टाडा कोर्टासमोर शरणागती पत्करली. सध्या तो येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. दरम्यान, संजय दत्तला विभागीय आयुक्तांनी येरवडा कारागृहातून १४ दिवसांसाठी सुट्टी मंजूर केलीय. जेल प्रशासनानं त्याला ही रजा मंजूर करण्यात आलीय... रजा मंजूर झाल्यानंतर आज सकाळीच संजय दत्त येरवडा तुरुंगाबाहेर पडलाय... थोड्याच वेळात तो मुंबईत दाखल होणारेय.. तसं पाहता, येत्या ५ तारखेपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होतेय.. आणि संजय दत्तच्या घरीही 'मातारानी की चौकी' मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.. यावेळी संपूर्ण बॉलिवूड संजय दत्तच्या घरी आवर्जून हजेरी लावतं. त्यामुळे संजय दत्तला मंजूर करण्यात आलेली १४ दिवसांची संचित रजा मातारानीची सेवा करण्यात संजूबाबा घालवेल, असंही म्हणता येईल.
संजय दत्त गेल्या पाच महिन्यांपासून कारागृहात शिक्षा भोगत आहे. कारागृहात दाखल झाल्यावर संजय दत्तनं पायावर उपचार करण्यासाठी ‘पॅरोल’ रजेचा अर्ज केला होता. त्याचा याबाबतचा अर्ज विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांना मिळाला होता. देशमुख यांनी याबाबत माहिती घेऊन अर्ज मंजूर केला आहे.
कैद्यांना पॅरोलची रजा मिळते. त्यासाठी कुटुंबातील एखादी व्यक्ती गंभीर आजारी अथवा स्वतःवर उपचाराचं कारण ग्राह्य धरण्यात येतं. यापूर्वी संजयनं पत्नी मान्यता हिच्या आजारपणाचं कारण पुढे केलं होतं. महिन्याभरापूर्वी त्यानं तसा अर्जही केला होता. परंतु, त्यावेळी त्याची `पॅरोल`वर सुटका झाली नव्हती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.