‘बीग बॉस’साठी १३० कोटींची दबंग डील!

बॉलीवूडचा ‘टायगर’ सलमान खान पुन्हा एकदा दबंग ठरलाय. सलमान खाननं फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर छोट्या पडद्यावरही आपलं वर्चस्व निर्माण केलंय. लवकरच सुरु होणाऱ्या बीग बॉस सीझन-७ चं यजमान पद पुन्हा एकदा सलमानालाच मिळालंय.... आणि यासाठी निर्मात्यांनी तब्बल १३० करोड रुपये फक्त सलमानसाठी मोजलेत.

Updated: Jul 31, 2013, 12:36 PM IST

www.24taas.com झी मीडिया, मुंबई
बॉलीवूडचा ‘टायगर’ सलमान खान पुन्हा एकदा दबंग ठरलाय. सलमान खाननं फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर छोट्या पडद्यावरही आपलं वर्चस्व निर्माण केलंय. लवकरच सुरु होणाऱ्या बीग बॉस सीझन-७ चं यजमान पद पुन्हा एकदा सलमानालाच मिळालंय.... आणि यासाठी निर्मात्यांनी तब्बल १३० करोड रुपये फक्त सलमानसाठी मोजलेत.
होय, सलमाननं बीग बॉस सीझन-७ साठी निर्मात्यांशी डील साईन केलीय. या कार्यक्रमाच्या एका भागासाठी तो तब्बल पाच कोटी कमावणार आहे. २६ भागांच्या होणाऱ्या या कार्यक्रमासाठी त्यानं १३० करोड रुपयांची डील साईन केलीय. सलमाननं आत्तापर्यंतची सर्वात मोठी डील साईन केलीय. या बाबतीत सलमानने बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन आणि परफेक्शनिस्ट अमिर खान, बॉलिवूडचा किंग शाहरुख खान यांनादेखील मागे टाकलंय.
सलमानची दुहेरी भूमिका
सलमान खान होस्ट करत असलेल्या या सातव्या पर्वाचं वेगळेवपण म्हणजे खुद्द सलमान खानंचा डबल रोल... या पर्वात सलमान दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. सलमान देवदूत आणि राक्षस अशा दोन भूमिका साकारणार आहे. सलमानची दुहेरी भूमिका असल्याने त्याला अधिक काम करावं लागेल. तो एकाच दिवशी दोन शूट करणार आहे, यामुळे त्याला जास्त रक्कम देण्यात येत असल्याचं समजतंय.

‘हिट अॅन्ड रन’ खटल्याच्या निकालापूर्वीच पूर्ण होणार शुटींग
‘हिट अॅन्ड रन’खटल्यासंदर्भात सलमान खानवर आरोपनिश्चितीची प्रक्रिया प्रार पडलीय. त्यामुळेच संजय दत्तच्या शिक्षासुनावणीनंतर बॉलिवूडच्या गुंतवणुकदारांनी आता धडा घेतला असेल, असं वाटत असतानाच सलमानचं नाव या शोसाठी निश्चित करण्यात आल्यानं आश्चर्यही व्यक्त होतंय. पण, सलमानच्या निकालाअगोदरच या कार्यक्रमाचं शूटींग पूर्ण होईल, असं सांगण्यात येतंय.

या कार्यक्रमासाठी अगोदर शाहरुख खानचंही नाव चर्चेत होतं. पण अखेर सलमानच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं. सलमानच्या चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यानं या कार्यक्रमासाठी अभिनेत्रा सलमान खानलाच यजमानपदी बघण्याची सर्वांची इच्छा आहे. त्याच्या या कार्यक्रमासाठी अनेक जण उत्सुक आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.