अहो आश्चर्यम... सलमान खानला शाहरुखचा पाठिंबा

सैफई महोत्सवातील परफॉरमन्सवरून वादाच्या भोवऱ्या अडकलेला सलमान खान याने आपल्या फेसबुक पेजवरून खुलासा केल्यानंतर सलमानला चक्क अभिनेता शाहरुख खानने पाठिंबा दिला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 10, 2014, 12:17 PM IST

www.24taas.com, गायत्री शंकर, झी मीडिया, मुंबई
सैफई महोत्सवातील परफॉरमन्सवरून वादाच्या भोवऱ्या अडकलेला सलमान खान याने आपल्या फेसबुक पेजवरून खुलासा केल्यानंतर सलमानला चक्क अभिनेता शाहरुख खानने पाठिंबा दिला आहे.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यांनी आपल्या गावी सैफई महोत्सवाचे आयोजन केले होते. एकीकडे मुज्जफरपूर दंगलग्रस्त थंडीत कुडकुडत असताना युपीवर सत्तेवर असलेल्या समाजावादी पक्षाने सैफई महोत्सवात बॉलीवुडच्या ताऱ्यांना नाचविले. याबाबत सर्व स्तरातून टीका होत आहे.
सलमान खानने आपल्या फेसबूक पेजवर लिहिले आहे की, जेव्हा मी कोणत्याही ठिकाणी परफॉर्मन्स किंवा प्रमोशन करायला जातो, तेव्हा तेथील स्थानिक नागरिंकाच्या आरोग्य आणि शिक्षणाला मदत होईल, हे पाहतो. नागपूरमध्ये बीइंग ह्यमुमनच्या वतीने असाच कार्यक्रम करण्यात येतो.
इटावामध्ये बिइंग ह्युमनच्या वतीन उत्तर प्रदेशातील २०० पिडीयाट्रीक हार्ट सर्जरीसाठी पैसा गोळा करण्याचे आश्वासन त्या ठिकाणी परफॉरमन्स करणाऱ्या कलाकारांनी केले आहे. जवाहरलाल मेडीकल कॉलेजला २५ लाख रुपयांचीही मदत केली आहे.
यानंतर शाहरुख खानने आश्चर्यरित्या सलमानला या प्रकरणी पाठिंबा दिला आहे. या प्रकरणात सिने अभिनेत्यांना ओढणे चुकीचे आहे, असे शाहरुख खान याने म्हटले आहे.

एका पत्रकार परिषदेत बोलताना शाहरुख म्हणाला, या ठिकाणी मी केवळ दोन गोष्टी सांगू शकतो, आम्ही कलाकार आहोत. आम्ही आमची कला सादर करत असतो. हा कार्यक्रम कशासाठी घेतला आहे याची कल्पना आम्हांला नसते. एखादा कार्यक्रम सादर केल्यानंतर त्याला काय वादाची पार्श्वभूमी आहे हे आम्हांला माहित नसते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.