रणबीर कस्टम अधिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकतो तेव्हा...

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याला ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आलाय. लंडनहून परतताना ड्यूटी फ्री सामान घेऊन येणाऱ्या रणबीर कपूरला काल रात्री मुंबई विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 4, 2013, 01:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याला ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आलाय. लंडनहून परतताना ड्यूटी फ्री सामान घेऊन येणाऱ्या रणबीर कपूरला काल रात्री मुंबई विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
रणबीरवर या सामानाची माहिती लपवण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप ठेवण्यात आला. कस्टम अधिकाऱ्यांनी तीन तास चौकशी केल्यानंतर ५० हजारांचा दंड वसूल करून रणबीरला सोडण्यात आलं.

रणबीर कपूर ब्रिटीश एअरवेजनं मुंबई एअरपोर्टवर दाखल झाला होता. लंडनहून परतताना आपल्यासोबत त्यानं काही सामानही आणलं होतं. परंतू ते ड्यूटी फ्री होतं. परंतू या सामानाची कोणतीही माहिती त्यानं एअरपोर्ट अधिकाऱ्यांच्या चौकशीदरम्यान लपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अधिकाऱ्यांचा रणबीरवर असलेला संशय बळावला. त्यामुळे अधिक चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी त्याला रोखलं आणि दंड वसूल केल्यानंतर त्याला सोडण्यात आलं.