दीपिका-रणबीरची जादू; १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री!

दीपिकाची ‘लीला’ प्रेक्षेकांना चांगलीच भावलीय आणि रणबीरचीही जादू चांगलीच चाललीय. म्हणूनच तर ‘रामलीला – गोलियों की रासलीला’ या चित्रपटानं १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री मिळवलीय.

Updated: Nov 26, 2013, 07:31 PM IST

www.24taas.com. झी मराठी, मुंबई
दीपिकाची ‘लीला’ प्रेक्षेकांना चांगलीच भावलीय आणि रणबीरचीही जादू चांगलीच चाललीय. म्हणूनच तर ‘रामलीला – गोलियों की रासलीला’ या चित्रपटानं १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री मिळवलीय. केवळ आठ दिवसांतच १०० कोटींचा टप्पा पार केला. १०० कोटीचा टप्पा पार करणारा हा दीपिकाचा सलग चौथा चित्रपट ठरलाय.

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या रामलीला चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर १००.२ कोटींची कमाईची नोंद केलीय. या चित्रपटाच्या आधी आमिर खानचा थ्री इडियट्स, सलमान खानचा एक था टायगर आणि ग्रँड मस्ती हे चित्रपटदेखील १०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाले होते.
याआधी दीपिकाच्या रेस २, ये जवानी हैं दीवानी आणि चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटांनीही १०० कोटीचा आकडा पार केला होता.
शाहरूक, दीपिका यांचा चेन्नई एक्सप्रेस चित्रपट आणि ऋतिक रोशन यांचा क्रिश-३ या चित्रपटांनी तर प्रदर्शित होताच चार-पाच दिवसांच्या आताच १०० कोटीचा आकडा पार केला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.