पूनम पांडेंचं सूत्र, एच फॉर हॅबिट, एस फॉर सेक्स....

हॉट मॉडेल आणि बिकनी गर्ल पूनम पांडेंने पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे, पूनमने ट्विटरवर ट्विट केलं आहे की, तिने एक अडल्ट सिनेमा साईन केला आहे.

Updated: Oct 26, 2012, 05:05 PM IST

www.24taas.com, मुंबई
हॉट मॉडेल आणि बिकनी गर्ल पूनम पांडेंने पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे, पूनमने ट्विटरवर ट्विट केलं आहे की, तिने एक अडल्ट सिनेमा साईन केला आहे. ज्यात बरेच मसालेदार सिन असणार आहेत. या सिनेमाचा निर्माता अमित सक्सेना असणार आहे.
जिस्म - २ या सिनेमाची निर्मीतीही अमित सक्सेनानेच केली होती. सध्या तरी या सिनेमाच्या नावाबाबत पूनमने काहीही खुलासा केलेला नाही. सिनेमा फक्त तीन अक्षरांनी सुरू होईल. ज्याचं पहिलं अक्षर ए असणार, दुसरं अक्षर एच असेल तर एच फॉर हॅबिट आणि तिसरं अक्षर एस म्हणजे सेक्स. म्हणजेच सेक्सची सवय जडण्याविषयी पूनमने म्हटंले आहे.
पूनम म्हणते की, सेक्सबाबत आपण सुरवातीला अगदीच जुजबी गोष्टी करीत असतो. त्यानंतर हळूहळू ते आपल्याला आवडू लागतं त्यानंतर सेक्ससाठी काहीही करण्याची आपली तयारी असते. त्यानंतर ही आवड एवढी बळावते की, त्यासाठी आपण काय करतोय याचाही विचार करणं सोडून देतो. पूनमने तिच्या चाहत्यांना एक आश्वासन दिलं आहे की, या सिनेमात त्यांना फार मोठ्या प्रमाणात सेक्स दृश्य पाहायला मिळतील. पूनम म्हणते की, सिनेमा अडल्ट आहे, मात्र त्याची कथा फारच चांगली आहे.