मल्टी पार्टनर सेक्स ट्रेंड वाढतो- महेश भट्ट

एक व्यक्तीशी शारीरिक संबंध (सेक्स) करण्याचा विचार जुना झाला आहे. आता लोक नव-नवीन लोकांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करीत आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 10, 2013, 07:34 PM IST

www.24taas.com, मुंबई
चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट्ट हे नेहमी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात, पण आता त्यांनी खळबळजनक विधान करून हद्दच केली. एक व्यक्तीशी शारीरिक संबंध (सेक्स) करण्याचा विचार जुना झाला आहे. आता लोक नव-नवीन लोकांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करीत आहे. ते ऐवढे बोलून थांबले नाही. ते म्हणाले ही परिस्थिती मोठ्या शहरांबरोबर छोट्या शहरांमध्ये वाढत आहे.
महेश भट्ट यांनी आपला आगामी चित्रपट मर्डर-३च्या संदर्भात हे विधान केले आहे, पण या विधानाने बी टाऊनमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तो काळ वेगळा होता की, जेव्हा एक व्यक्ती एकाच व्यक्तीशी सेक्स संबंध ठेवत होता. आज काळ बदलला आहे. लोक मल्टी पार्टनरचा स्वीकार करीत आहे. हे त्यांच्या दृष्टीने चुकीचे नाही. पुरूष असेल किंवा स्त्री प्रत्येकाला या बाबतीत सूट असली पाहिजे अशी वरकडीही त्यांनी यावेळी केली आहे.
चित्रपटांचा समाजावर पडणाऱ्या परिणामाबद्दल बोलताना महेश भट्ट म्हणाले, सध्याचा काळ वेगाने बदलत आहे. युवा पिढी फार पुढे निघून गेली आहे. पण त्या वेगाने आजचा चित्रपट पुढे जात नाही. चित्रपटांना काळाच्या पुढे राहिले पाहिजे. बॉलिवुड लोकांच्या पसंतीप्रमाणे पुढे जात नाही. पण मी दावा करतो की आगामी मर्डर-३ हा चित्रपट तुम्हांला याबाबत तक्रार करायला जागा देणार नाही.
एका व्यक्तीने एका व्यक्तीशीच यौन संबंध ठेवायला हवे हे मी मानतो, पण आता काळ बदलला असल्याचे भट्ट यांनी सांगितले. बदलत्या काळानुसार लोकांनी समलैगिंक संबंधांना स्वीकार केला आहे. तशीच मल्टी पार्टनर संकल्पनेला स्वीकार्यता मिळत आहे. हे मोठ्या शहरांबरोबर छोट्या शहरातही हे वळण आले आहे.