मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरनं केलं मरणोत्तर अवयवदान

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा चित्रपटांव्यतिरिक्त सामाजिक कार्यातही तितकाच परफेक्ट असतो. नुकताच आमिरनं मरणोत्तर अवयवदान केलंय. शनिवारी केईएम रुग्णालयात आयोजित एका कार्यक्रमात आमिर हा निर्णय घेतला. आमिर खान सध्या त्याच्या `सत्यमेव जयते` या कार्यक्रमाद्वारे समाजात एक नवा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित त्यातलंच त्याचं हे एक पाऊल असेल.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 31, 2014, 02:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा चित्रपटांव्यतिरिक्त सामाजिक कार्यातही तितकाच परफेक्ट असतो. नुकताच आमिरनं मरणोत्तर अवयवदान केलंय. शनिवारी केईएम रुग्णालयात आयोजित एका कार्यक्रमात आमिर हा निर्णय घेतला.
आमिर खान सध्या त्याच्या `सत्यमेव जयते` या कार्यक्रमाद्वारे समाजात एक नवा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित त्यातलंच त्याचं हे एक पाऊल असेल.
`जिवंत असताना तुम्ही चांगलं काम केलं नसेल, तर मृत्यूपूर्वी असं काही करा की लोकांच्या कायम स्मरणात राहील`, असं भावनिक आवाहन या वेळी आमिरनं केलं.
हल्लीच एका कार्यक्रमात आमिरची पत्नी किरण राव हिनंही अवयदान करणार असल्याचं म्हटलं होतं. तिला ही कल्पना `शीप ऑफ थिसस` या चित्रपटद्वारे आल्याचं तिनं सांगितलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.