`टीना अॅण्ड लोलो`मध्ये सनीचा जलवा

पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन तिच्या आगामी चित्रपट `टीना अॅण्ड लोलो` मध्ये अधिकच बोल्ड सीनमध्ये दिसणार आहे. सुत्रांनूसार सनी लियोन या चित्रपटात टॉपलेस सीनमध्ये करतांना दिसेल.

Updated: Mar 30, 2014, 04:43 PM IST

www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई
पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन तिच्या आगामी चित्रपट `टीना अॅण्ड लोलो` मध्ये अधिकच बोल्ड सीनमध्ये दिसणार आहे. सुत्रांनूसार सनी लियोन या चित्रपटात टॉपलेस सीनमध्ये करतांना दिसेल.
सनी `टीना अॅण्ड लोलो` या चित्रपटातून अॅक्शन चित्रपटात एण्ट्री करणार आहे. सुत्रांनूसार, `या चित्रपटात शूट झालेले सीन नक्कीच प्रेक्षकांचा पसंतीस पडतील`. हे सीन मलेशियात शूट झालेत. देवांग ढोलकिया निर्मित `टीना अॅण्ड लोलो` या चित्रपटात सनी लिओनसोबत करिश्मा तन्नाही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
या चित्रपटाच्या शूटिंगच्यावेळी सनी लिओन अॅक्शन सीन करताना जखमी झाली होती. सनी आणि करिश्माने चित्रपटात अनेक स्टंट केलेत. त्यामुळे दोघींनाही अॅक्शन सीन करताना सुरक्षा दिली होती, मात्र दुर्दैवाने सनी जखमी झाली असे, चित्रपट निर्माता देवांग ढोलकियाने सांगितलं.
२०१२मध्ये चित्रपट `जिस्म-२`पासून बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात करणारी सनी लिओननं `जॅकपॉट` आणि `रागिनी एमएमएस २` सारख्या चित्रपटात काम केलंय. बिग बॉसमध्ये एण्ट्री केल्यानंतर सनी चर्चेत आली. इतकंच नाही तर सनी गुगल इंडियाद्वारा जाहीर झालेल्या सर्वात जास्त सर्च व्यक्तिमत्व यादीत शाहरुख खान आणि सचिन तेंडुलकर सारख्या सेलिब्रिटीजमध्ये अव्वल क्रमांकावर आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.