मकरंद अनासपुरे, सुबोध भावे आणि संजय नार्वेकरची फसवणूक

निर्मात्यांनी फसवणूक केल्याची तक्रार अभिनेता मकरंद अनासपूरे, सुबोध भावे आणि संजय नार्वेकर यांनी निर्माता संजय चौधरी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 16, 2013, 12:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सुबोध भावे आणि मकरंद अनासपूरे यांचा `माझा भाऊ मकरंद` या सिनेमाच्या रिलीजला कोर्टाने स्थगिती दिली आहे. निर्मात्यांनी फसवणूक केल्याची तक्रार अभिनेता मकरंद अनासपूरे, सुबोध भावे आणि संजय नार्वेकर यांनी निर्माता संजय चौधरी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
तब्बल १० वर्षांपूर्वी ‘दिल दिल हिंदुस्तान’ नावाचा हिंदी सिनेमा करत असल्याचं सांगत मकरंद आणि सुबोधला साईन करण्यात आलं होतं. सिनेमाचं 70 टक्के शुटिंगही पूर्ण झालं होतं. दरम्यानच्या काळात दिग्दर्शक दयाल निहलानी यांनीही सिनेमातून काढता पाय घेतला. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच मकरंद आणि सुबोधनेही सिनेमातून एक्झिट घेतली. त्यानंतर मराठी सिनेमा करत असल्याचं सांगत संजय चौधरी यांनी संजय नार्वेकरला साईन केलं.
अवघ्या तीन दिवसच या सिनेमाचं शुटिंग झालं आणि अखेर हिंदी आणि मराठी हे दोन्ही सिनेमा मिळून ‘माझा भाऊ मकरंद’ हा सिनेमा निर्मात्याने तयार केला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.