रणबीरला भेटण्यासाठी कतरीना आईसोबत मुंबईत दाखल!

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरीना कैफ यांनी आपल्या नववर्षाची सुरुवात परदेशात एकत्र केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच रणबीर एकटाच भारतात परतला...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 12, 2014, 06:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरीना कैफ यांनी आपल्या नववर्षाची सुरुवात परदेशात एकत्र केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच रणबीर एकटाच भारतात परतला... त्यानंतर आता कतरीनाही आता आपल्या आईसोबत भारतात दाखल झालीय. यावेळी ती भलतीच खूश दिसत होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कतरीना आणि तिचा कथित बॉयफ्रेड रणबीर कपूर यांनी न्यूयॉर्कमधल्या एका खाजगी स्थळावर आपल्या नववर्षाची सुरुवात केली होती. इथं खूपच थंडी असल्यानं कतरीनाला फ्लू झाला होता. यामुळेच ती आपल्या कुटुंबीयांसोबत राहण्यासाठी लंडनमध्ये गेली होती.
न्यूयॉर्कमध्ये सुट्ट्यांदरम्यान कतरीना आजारी पडल्यानंतर तिची संपूर्ण देखभाल रणबीरनंच केली होती. तोच तिला तिच्या कुटुंबीयांकडे घेऊन गेला होता. या संपूर्ण दोऱ्यादरम्यान रणबीरनंच कतरीनाची साथ दिली होती.

यानंतर काही दिवसांपूर्वी रणबीर मुंबई विमानतळावर एकटाच परतताना दिसला. तेव्हा साहजिकच अनेकांना कतरीना कुठंय? असा प्रश्न पडला. आणखी खोलात गेल्यावर ती आपल्या कुटुंबीयांसोबत असल्याचं समजलं.
रणबीरचे आभार मानण्यासाठी कतरीनाही आता मुंबईत दाखल झालीय. यावेळी तिची आई सुझान तिच्यासोबत मुंबईत आलीय. यावेळी ती खूपच खूश दिसत होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.