करीनानं दिला दीपिकाला डच्चू

`६०० करोड की दीपिका` अशी बॉलीवूडमध्ये ओळख निर्माण केलेल्या दीपिकाला एकावर एकाहून एक सिनेमांच्या ऑफर्सची बरसात होताना दिसतेय. मात्र, संजय लिला भन्सालीच्या आगामी सिनेमात दीपीका ऐवजी वर्णी लागलीय ती बेबो करिना कपूरची...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 7, 2014, 08:49 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`६०० करोड की दीपिका` अशी बॉलीवूडमध्ये ओळख निर्माण केलेल्या दीपिकाला एकावर एकाहून एक सिनेमांच्या ऑफर्सची बरसात होताना दिसतेय. मात्र, संजय लिला भन्सालीच्या आगामी सिनेमात दीपीका ऐवजी वर्णी लागलीय ती बेबो करिना कपूरची...
बॉलीवूडमध्ये एकमेकाला टक्कर द्यायला हिरॉईन्स नेहमीच तयार असतात... त्यातच टॉप हिरॉईन्समध्ये कॅट फाईट रंगत असेल तर मग त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता आणखीनच ताणली जाते. सध्या बॉलीवूडमध्ये कमी वेळातच हिट ठरलेली हिरॉईन म्हणजे ‘डिंपल गर्ल’ दीपिका पादूकोण... मात्र, आता दीपिकाला टक्कर देण्यासाठी वर्णी लागलीये ती बेबो करिना कपूरची...
शाहरुखसोबत बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतलेल्या दीपिकाकडे आजच्या तारखेला सिनेमांची काही कमी नाही. संजय लीला भन्सालीचा नुकताच ‘रामलीला’ हा सिनेमा हिट दिल्यानंतर दिपिकाची वाहवा झाली होती. त्यामुळे साहजिकच भन्सालीच्या आगामी सिनेमामध्येदेखील दीपिका असेल अशी अपेक्षा असणारच... पण, यावेळी ही आशा फोल ठरलीय.
भन्सालीच्या आगामी ‘बाजीराव-मस्तानी’ या सिनेमात दीपिकाऐवजी बेबो करिना लिडींग रोलमध्ये झळकणार असल्याचं कळतंय. दीपिकाचं वाढतं स्टारडम असलं तरी करिनानेही आपली अभिनयाची जादू बॉलीवूडवर कायम ठेवल्याचं यावरून दिसतंय.
आता दीपीकाच्या तोंडाशी आलेला घास अचानक बेबोला मिळाल्याने त्यांच्यात कॅट फाईट रंगणार का? हे येणारा काळंच ठरवेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.