पुन्हा लव्हस्टोरी सुरू, रणबीर-कतरिनात समेट?

बॉलिवूडचं हॉट कपल रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यात पुन्हा समेट झाल्याचं कळतंय. त्यामुळं त्यांची लव्हस्टोरी पुन्हा एकदा सुरू झालीय. बॉलिवूडमध्ये याची चर्चाही आता नव्यानं होतेय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Feb 4, 2014, 01:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडचं हॉट कपल रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यात पुन्हा समेट झाल्याचं कळतंय. त्यामुळं त्यांची लव्हस्टोरी पुन्हा एकदा सुरू झालीय. बॉलिवूडमध्ये याची चर्चाही आता नव्यानं होतेय.
अलिकडेच आमिर खानच्या बॅशमध्ये हे लव्हबर्ड्स एकत्र दिसले. काही महिन्यांपूर्वी स्पेनमध्ये सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी गेलेल्या रणबीर-कतरिनाचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली होती. तेव्हा त्यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला होता.
मीडियामध्ये हे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर ही आमची खाजगी बाब म्हणत कतरिना-रणबीरनं बोलणं टाळलं होतं. या दोघांच्या जोडीनं `अजब प्रेम की गजब कहानी` आणि राजकीय विषयावर आधारित `राजनिती` या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. ऑनस्क्रिन सोबतच ऑफस्क्रिनही दोघं एकत्र दिसायचे.
मात्र, काही दिवसांपूर्वी रणबीर जेव्हा लग्नाचं प्रपोजल घेऊन कतरिनाकडे गेला तेव्हा आपल्याला आता करिअरवर फोकस करायचं असं म्हणतं, लग्नाला तिनं नकार दिल्याची चर्चा होती. पण आता हा दुरावा दूर झाला असून दोघांमध्ये समेट झाल्याचं दिसतंय.
आता रणबीर-कतरिना एकत्र पार्टीच करत नाहीयेत तर चुंबनही घेतांना आढळले. तेव्हा आता पुन्हा ही लव्हस्टोरी सुरू झाल्याचं स्पष्ट होतंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.