फिल्म रिव्ह्यू : शुद्ध देसी रोमान्स

आपण लग्नातून वधू पळून जाताना अनेक वेळा पाहिले असेल, होय ना! पण, शुद्ध देसी रोमान्स या सिनेमात मात्र ‘वर’ बनलेला आपला नायक लग्नातून पाय काढताना पाहायला मिळणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 6, 2013, 05:16 PM IST


फिल्म रिव्ह्यू : शुद्ध देसी रोमान्स
कलाकार : सुशांत सिंग राजपूर, परिणीती चोप्रा, वाणी कपूर, ऋषी कपूर
दिग्दर्शक : मनीष शर्मा
निर्माता : आदित्य चोप्रा

आपण लग्नातून वधू पळून जाताना अनेक वेळा पाहिले असेल, होय ना! पण, शुद्ध देसी रोमान्स या सिनेमात मात्र ‘वर’ बनलेला आपला नायक लग्नातून पाय काढताना पाहायला मिळणार आहे. बरं, या वराला जबरदस्तीनं बोहल्यावर चढवलाय का? तर नाही... मग, वधू कुरूप, जाडी आहे का? तर नाही... ती तर खूप सुंदर आणि ‘वधू’च्या साच्यात बसणारी साधी-सुधी मुलगी आहे... आणि आणखी म्हणजे तिला तर आपल्या नायकानंच आपली पार्टनर म्हणून निवडलंय. पण, शुद्ध देसी ‘कन्फ्यूजन’मध्ये असणारा आपला नायकानं ‘शुद्ध देसी रोमान्स’च्या कथेला चित्रपटाचं स्वरूप दिलंय. मनिष शर्मा यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय.

काय आहे कथानक...
आपल्या चित्रपटाचा नायक रघु राम (सुशांत सिंग राजपूर)... रघु हा सर्टिफाईड टुरिस्ट गाईड आहे तसंच तो एका स्टोअरमध्ये पार्टटाईम सेल्समनचंही काम करतो. कधी कधी तो ‘ताऊजी’च्या (ऋषी कपूर) एजन्सीमध्येही काम करतो. लग्नाची तयारी करणं आणि लग्नाच्या दिवशी पैसे देऊन लग्नाच्या वेळी गर्दी जमवण्याचं काम ताऊजीच्या एजन्सीचं... राजस्थानच्या जयपूरमध्ये लव्ह मॅरेजला आपला विरोध दर्शवण्यासाठी अनेक लोक आपल्या नातेवाईकांच्या लग्नाला उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे ताऊजीचा धंदा चांगला सुरू आहे.
रघुरामचं लग्न ताराशी (वाणी कपूर) ठरलंय... यामध्येही ताऊजी चांगले शिकले-सवरलेलं वऱ्हाड सप्लाय करतात. रघुरामचा लग्नावर आणि कमिटमेंटवर अजिबात विश्वास नाही त्यामुळे रघुराम त्याच्या भावी वधूला तिथंच सोडून पळ काढतो.
यावेळी लग्नाच्याच दिवशी आपल्या नायकाची ओळख त्याची बहिण म्हणून लग्नात सहभागी झालेल्या गायत्रीशी (परिणीती चोप्रा) त्याची ओळख झालेली असते होते. लग्नातून सुटका झालेल्या रघुची पुन्हा एकदा गायत्रीशी भेट होते. पहिल्याच नजरेत दोघंही एकमेकांकडे आकर्षित झालेले असतात. मग काय, जयपूरमध्ये गायत्री आणि रघु यांचा लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये संसार सुरू होतो. इथं सुरू होतो परिणीती आणि सुशांतमध्ये रोमान्स...
गोष्ट लग्नाच्या उंबरठ्यावर येऊन पोहचते... पण, यावेळी गायत्री रघुचा विश्वासघात करते आणि लग्नातून पळून जाते. यानंतर पुन्हा एकदा रघुच्या जीवनात ताराचा प्रवेश होतो... जिचा रघुनं पूर्वी विश्वासघात केलेला आहे. पण, लगेचच ताराचा रोल काही संपत नाही... पुढे काय होतं, हे पाहण्यासाठी सिनेमा पाहणं मनोरंजक ठरेल.
सिनेमात लग्न, कमिटमेंट या गोष्टींवर अतिशय चांगल्या पद्धतीनं चर्चा घडून येताना दिसते. तर दुसऱ्या बाजुला ‘ताऊजी’ हे पात्र अतिशय संवेदनक्षम, तितकंच मनोरंक आणि परिपक्वही दाखवलंय.
दिग्दर्शन मस्त जमलंय
दिग्दर्शक मनीष शर्मा यांचं दिग्दर्शक उठावदार आहे. मनिष शर्मा दिग्दर्शित शुद्ध देसी रोमान्स या सिनेमात लग्न आणि आजच्या पिढीतील तरुणांची विचारसरणी यांचा मेळ चांगला रंगलाय... सिनेमात रघु आणि गायत्रीचं प्रेमप्रकरण आणि भावभावनांची गल्लत चांगली जमलीय. पण, दोन मुलींमध्ये रघु नेमका एवढा गोंधळलेला का आहे हे शेवटपर्यंत समजत नाही..
रोमान्टिक कलाकार
शुद्ध देसी रोमान्समधल्या कलाकारांची भट्टी मात्र चांगलीच जमलीय. परिणीती आणि सुशांतनं त्यांची काम चांगल्या पद्धतीनं आपल्या भूमिकांना उठावदार बनवलंय. वाणी कपूर हिचा हा पहिलाच सिनेमा आहे... पण, तिनंही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिलीय. संपूर्ण सिनेमात ती मोठ्या आत्मविश्वासानं वावरताना दिसते... तिचा हा पहिला सिनेमा आहे असं प्रेक्षकांना बोलायला जड जाईल इतकं... म्हणजेच बॉलिवूडला आणखी एक नवीन चेहरा मिळालाय असं म्हणायला हरकत नाही. ऋषि कपूर नेहमीप्रमाणेच ज्या सीनमध्ये असतील तिथं तिथं त्यांनी आपली छाप सोडलीय.
संवाद
जयदीप साहनी या सिनेमाची कथा आणि संवाद लिहिलेत... नवीन काहीतरी कानी पडावं असं वाटत असेल तर संवाद ऐकू शकता... लग्न आणि लिव्ह इन यांवर वेगवेगळे विचारही कानी पडतात. परंतु रोमान्सच्या नावावर बॉलिवूडमध्ये जे काही प्रेक्षकांना पाहावं लागतं त्यापेक्षा हा सिनेमा थोडा वेगळा वाटतो...
गुलाबी जयपूर
या सिनेमात जयपूरचं चित्रण एव्हढ्या सुंदर रितीनं करण्यात आलंय की गुलाबी थंडीत हे गुलाबी शहर एकदा तरी पाहावं असं सारखं वाटत राहतं...

शेवटी काय तर...
‘बॅन्ड बाजा बारात’