इम्रानच्या कोवळ्या अयानला कँन्सर

बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी सध्या त्याच्या आयुष्यातील अत्यंत कठिण प्रसंगाला सामोरा जाताना दिसतोय. एका वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, इम्रानच्या चार वर्षांच्या चिमुकला – अयानला कँन्सरसारख्या दुर्धर आजाराशी दोन हात करतोय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 15, 2014, 04:06 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी सध्या त्याच्या आयुष्यातील अत्यंत कठिण प्रसंगाला सामोरा जाताना दिसतोय. एका वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, इम्रानच्या चार वर्षांच्या चिमुकला – अयानला कँन्सरसारख्या दुर्धर आजाराशी दोन हात करतोय.

‘जन्नत’ फेम इम्रानचे काका महेश भट्ट यांनी एका दैनिकाशी बोलताना ही माहिती दिलीय. मुंबईतील हिंदुजा हॉस्पीटलमध्ये कोवळ्या अयानच्या किडनीत डॉक्टरांना गाठ आढळली होती. यामुळे अयानच्या जीवालाही धोका होता. पण, सुदैव म्हणजे अयानचा कँसर पहिल्याच स्टेजमध्ये असतानाच डॉक्टरांना याचा थांगपत्ता लागला आणि डॉक्टरांनी ताबडतोब त्यावर उपचार सुरू केले. डॉक्टरांनी तात्काळ यावर शस्त्रक्रियेचा निर्णय घेतलाय. केमोथेरेपीच्या साहाय्याने कँन्सरचं मूळ उपटून टाकण्याचा प्रयत्न डॉक्टर करणार आहेत.
अशा परिस्थिती इम्रान आणि त्याची पत्नी हे भावनात्मकरित्या अतिशय हळवे झालेले दिसले. आपल्या कोवळ्या जीवाला केमोथेरेपीसारख्या उपचारातून जाताना पाहताना त्यांना आपला मानसिक तोल सावरता येत नाहीय, असं भट्ट यांनी म्हटलंय.
इम्रान आपला तोल सावरून आपल्या चिमुरड्याला दुर्धर आजारातून बाहेर काढण्यासाठी वाट्टेल ते करण्याचा प्रयत्न करतोय. अयान लवकरच या आजारातून बाहेर पडेल, अशी इच्छा सगळेच व्यक्त करत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.