www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रणबीर कपूर आणि कतरीना कैफ यांच्या साखरपुड्याच्या चर्च्यांना उधाण आलंय. साहजिकच, यावर रणबीरची पूर्व गर्लफ्रेंड दीपिका पादूकोन हिची प्रतिक्रिया काय असेल असा प्रश्न या तारे-तारकांच्या अभिष्टचिंतकांना पडणं साहजिकच आहे... दीपिकानं तुमच्या या प्रश्नाला स्वत:हूनच उत्तर दिलंय.
दीपिका पादुकोन ही सध्या बॉलिवूडमधल्या ‘नंबर वन हिरोइन’ असण्याचा आनंद घेतेय. ती तिच्या सिनेमांसोबत रणबीर कपूरशी असलेल्या नात्याबद्दलही चर्चेत राहिली. रणबीर आणि कतरीनाचं नाव जोडलं गेल्यानंतर तर या चर्चेला जास्तच उधाण आलं. आता जेव्हा रणबीर आणि दीपिकाच्या साखरपुड्याबद्दल चर्चांना उधाण आलंय तेव्हा दीपिकानं आपलं तोंड उघडलंय.
‘रणबीर कुणाबरोबर डेटला जातो... कुणाबरोबर लग्न करतो... याबद्दल मला काहीही देणं-घेणं नाही. सगळ्यांचंच आपापलं खाजगी जीवन असतं त्याचा माझ्यावर काहीही फरक पडत नाही’ असं दीपिकानं यावर उत्तर दिलंय.
दीपिका, कतरीना आणि रणबीर या तिघांचा लव्ह ट्रँगल सध्याचा हॉट टॉपिक बनलाय. यामध्ये या तिघांनीही वेळोवेळी काही ना काही प्रतिक्रिया दिलीय... कधी शांतपणे तर कधी रागात... एक दुसऱ्याबद्दल बोलला की ती आपोआप बातमी बनते.
कतरीनाच्या वाढदिवशी रणबीर तिला प्रपोज करून साखरपुड्याची जाहीर घोषणा करणार अशी चर्चा आहेच... या बातमीपासून दीपिका तरी किती वेळ लांब राहू शकेल? पण, दीपिकानं मोठ्या आत्मविश्वासानं आता आपण एक सुपरहिट हिरोईन असल्याचं सांगितलंय. रणबीर आणि कतरीनाच्या खाजगी आयुष्यातील गोष्टींनी आपल्यासाठी काहीही महत्त्वाच्या नसल्याचंही तिनं म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.