www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
२०१३मध्ये बॉलिवूडनं अनेक नवे अध्याय रचले. भारतीय चित्रपटानं १०० वर्ष पूर्ण केले. या वर्षात तीन चित्रपटांनी २०० कोटींचा आकडा पार केला. अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.
आता २०१४ वर्षातही बॉलिवूडनं आपली कंबर कसलीय. आता एक नजर टाकूया कोणकोणते महत्त्वाचे चित्रपट २०१४मध्ये रिलीज होणार आहेत.
बॉलिवूडचा महत्त्वाचा सिनेमा म्हणजे ‘शोले’... शोले यंदा थ्रीडीमध्ये रिलीज केला जाणार आहे. १९७५मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा पाहायला तरुणांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. थ्रीडी शोले कसा दिसेल आणि तो बॉक्स ऑफिसवर किती चालेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
यावर्षात रिलीज होणारा दुसरा सिनेमा म्हणजे ‘डेढ इश्किया’... दिग्दर्शक अभिषेक चौबे यांनी ‘इश्किया’च्या यशानंतर हा सिक्वेल. माधुरी दीक्षितची यात प्रमुख भूमिका आहे. इश्किया चित्रपट खूप चांगला होता. त्यातले संवाद आणि नसिरुद्दीन शहा-अरशद वारसीची जुगलबंदीही मस्त होती. प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही जुगलबंदी पाहायला मिळेल.
सलमान खानच्या फॅन्ससाठी आणखी एक चित्रपट येतोय. २०१३मध्ये सलमान चित्रपटाद्वारे नाही तर बिग बॉसच्या माध्यमातूनच प्रेक्षकांसमोर आला. पण २०१४ची सुरुवातच सलमानचा ‘जय हो’ रिलीज होणार आहे. तब्बल एक वर्षानंतर सलमान मोठ्या पडद्यावर झळकतोय. आता पाहावं लागेल सलमान त्याच्या चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो की नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.