...आणि मिल्खा सिंग ओक्साबोक्सी रडलेत

फराह अख्तर याच्या ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाने कमाल केली. रूपेरी पडद्यावरील मिल्खाने वास्तवात भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांना रडविले. या सिनेमातील काही दृश्य पाहून मिल्खा सिंग ओक्साबोक्सी रडलेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 12, 2013, 01:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, चंदिगड
फराह अख्तर याच्या ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाने कमाल केली. रूपेरी पडद्यावरील मिल्खाने वास्तवात भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांना रडविले. या सिनेमातील काही दृश्य पाहून मिल्खा सिंग ओक्साबोक्सी रडलेत.
आपल्या जीवनातील वास्तव रुपेरी पडद्यावर ‘याचि देही याचि डोळा’ मिल्खा सिंग यांनी पाहिले. या वास्तवामुळे ते गहिवरलेत. आपण काय पाहतोय. माझ्या जीवनात काय घडले, याची आठवण सिनेमातून पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले.
‘भाग मिल्खा भाग’ या त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात फरहान अख्तरने त्यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. ही व्यक्तीरेखा मिल्खा यांना भावली. वठविलेली भूमिका आणि त्याचे काम पाहून मिल्खा यांच्या डोळ्यात पाणी आले. यावेळी रूपेरी पडद्यावरील मिल्खा फराह यांनेच त्यांचे डोळे पुसायला रुमाल दिला. तीन दिवसांपूर्वी लंडनमध्ये ‘भाग मिल्खा भाग’ पाहिला.

या चित्रपटातील उत्तरार्धातील काही दृश्य पाहून डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. त्यावेळी फरहानने डोळे पुसण्यासाठी ‘हँकरचिफ’ पुढे केला, असे मिल्खा यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.