www.24taas.com, मुंबई
समय चलते मोमबत्तियाँ, जलकर बुझ जाऐंगी |
श्रद्धा में डाले पुष्प, जल हीन मुर्झा जायेंगे |
स्वर विरोध के और शांति के, अपनी प्रबलता खो देंगे
किन्तू ‘निर्भयता’ की जलाई अग्नि हमारे हृदय को प्रज्वलित करेगी
जल हीन मुरझाये पुष्पों को हमारी अश्रु धाराएं जीवित रखेंगी
दग्ध कंठ से ‘दामिनी’ की ‘अमानत’ आत्मा विश्वतभर में गुंजेगी
स्वर मेरे तुम, दल कुचलकर पीस न पाओगे
मैं भारत की माँ, बहेनिया, बेटी हूँ,
आदर और सत्कार की मैं हकदार हूँ,
भारत देश हमारी माता है
मेरी छोडो, अपनी माता की तो पहचान बनो!
बीग बी अमिताभ बच्चन यांचा धीरगंभीर आवाज बी स्वरचित कविता म्हणताना आणखीनच गंभीर झाला होता. ही कविता त्यांनी आपल्या ट्विटरवर ऑडिओ स्वरुपात पोस्ट केलीय.
दिल्ली गँगरेप तरुणीच्या मृत्यूनंतर सारा देश हळहळतोय. ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. तरुणाई रस्त्यावर उतरुन न्याय मागताना दिसतेय. स्वत: जया बच्चन यांनी रस्त्यावर उतरुन सरकारचा निषेध व्यक्त केला होता. यावेळी भावना अनावर होऊन त्यांना रडू कोसळलं होतं. याच घटनेनं बीग बींनाही हादरवून सोडलंय. अमिताभ यांनी ट्विटरवरून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिलीय. महानायकाचा धीर-गंभीर आवाजामागचा मनाचा हळवा कोपरा या कवितेतून दिसून येतोय.
या ऑडिओच्या सुरुवातीला अमिताभ म्हणतात, ‘नमस्कार, आदाब, सत्सश्रीयाकाल... अमिताभ बच्चन बोल रहा हूँ... आज डिसेंबर महिन्याची २९ तारीख आहे आणि वर्ष आहे २०१२! सायंकाळचे सात वाजत आले आहेत. आज सकाळपासूनच दिल्लीतील बलात्कार पीडित मुलीचा मृत्यू झाल्याच्या बातम्या पाहताना, वाचताना दिवसभर माझे मन एकदम उदास आणि बेचैन होते. सकाळी मी ट्विटरवरून माझ्या भावना व्यक्त केल्या होत्या, मात्र माझे मन मला शांत बसू देत नव्हते. मी बसल्याबसल्या काही ओळी लिहिल्या आहेत. त्या तुम्हाला वाचून दाखवू इच्छितो’, असे म्हणत अमिताभ यांनी आपली ही स्वरचित कविता ऑडिओस्वरुपात मांडलीय.