ऐश्वर्या राय बच्चन कॉपीकॅट?

कान्सवर फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर आपल्या अदांनी काल सर्वांना घायाळ करणाऱ्या ऐश्वर्या राय-बच्चनवर आज कॉपीकॅट म्हणून चहूबाजुंनी टीका होत आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 22, 2014, 05:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
कान्सवर फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर आपल्या अदांनी काल सर्वांना घायाळ करणाऱ्या ऐश्वर्या राय-बच्चनवर आज कॉपीकॅट म्हणून चहूबाजुंनी टीका होत आहे. ऐश्वर्याने परिधान केलेला ड्रेस यापूर्वीच अकॅडमी अवॉर्ड सोहळ्यात एका अभिनेत्रीने परिधान केल्याने ऐश्वर्यावर टीका होत आहे.
फेस्टिव्हलच्या सातव्या दिवशी रेड कार्पेटवर माजी जगतसुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचे दर्शन तिच्या चाहत्यांना घडले. 2003मध्ये लॉरिएल ब्रॅण्डने ऐश्वर्याला त्यांची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली होती. गेल्या तेरा वर्षांपासून ती या आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये आपला सहभाग नोंदवत आहे. 2002 मध्ये ऐश्वर्या पहिल्यांदा कानच्या रेड कार्पेटवर अवतरली होती.
फेस्टिव्हलच्या सातव्या दिवशी हॉटेल मार्टिनेजमध्ये ऐश्वर्या गोल्डन Roberto Cavalli स्ट्रेपलेस गाऊनमध्ये रेड कार्पेटवर दिसली. या गाऊनचा आकार फिशसारखा होता. या गाऊनमध्ये ऐश्वर्या जणू जलपरीच दिसत होती. यावेळी बघणा-यांच्या नजरा तिच्यावरच खिळून राहिल्या.
क्रिस्टिन चेनोवेल या अभिनेत्रीने तसाच ड्रेस ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात परिधान केला होता. बच्चनांचा सूनेने या छोट्या गोष्टीकडे लक्ष दिले नसेल आणि ती फसली. ऐश्वर्या रायने होमवर्क केला असता तर तिची अशी फजिती झाली नसती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.