www.24taas.com, मुंबई
‘तलाश’ सिनेमातील आपली भूमिका आमिर खान जास्तच गांभिर्याने घेतलेली दिसतेय. प्रत्यक्षात आपला भूता-खेतांवर विश्वास नसला, तरी आमिर खानने या सिनेमात अतिमानवी शक्तींशी संबंधित कथेत काम केलं. मात्र आता तो खरोखरच्या भुतांच्या गावाला भेट देत आहे.
भुताटकीच्या गोष्टी अनेकजण सांगत असतात. मात्र या गोष्टी म्हणजे अंधश्रद्धा असल्याचंच म्हटलं जातं. तरीही राजस्थानमध्ये एक असं गाव आहे, जिथे भुतांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. ‘भानगड’ या गावाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही भुतांचं भानगड या नावानेच ओळखलं जातं. अनेक आंतरराष्ट्रीय वाहिन्यांवर यासंदर्भातील माहितीपट दाखवण्यत आले आहेत. अनेक अभ्यासक येथे अमानवी शक्तींबद्दल संशोधनही करत आहे.
जयपूरपासून 80 किमी दूर असणाऱ्या गावामध्ये सरकारनेही सुर्यास्तानंतर अधिकृतपणे ‘प्रवेश बंदी’च्या सूचना दिल्या आहेत. संध्याकाळी लोकांना गावात फिरण्याची बंदी शासनपुरस्कृत बंदी असणारं हे एकमेव गाव आहे. त्यामुळे एवढ्या भयानक गावात जाण्याचा मोह आमिर खानला टाळता आला नाही. लवकरच तो या गावाला भेट देणार आहे. आता त्याचा सामना खरोखर भुतांशी होतोय की नाही, ते तो भानगडवरून आल्यावर सांगेलच.